श्रीरामनवमी निमित्त पंतप्रधान, राष्ट्रपतींकडून देशवासियांना शुभेच्छा

श्रीरामनवमी निमित्त पंतप्रधान, राष्ट्रपतींकडून देशवासियांना शुभेच्छा

आज श्रीरामनवमीच्या शुभ दिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समस्त देशवासीयांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हे ही वाचा:

लसीकरण झाले मोफत

डोंबीवलीचे माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी यांचे निधन

जेष्ठ कलावंत किशोर नांदलस्कर यांचे निधन

बिना परीक्षा मॅट्रिक पास

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्वीट करताना म्हटले आहे,

राम नवमीच्या शुभ मुहुर्ताच्या निमित्ताने सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. मर्यादा पुरूषोत्तम श्रीरामचंद्रांच्या जन्मतिथीनिमित्त साजरा केला जाणारा हा उत्सव आपल्याला जीवनातील मर्यादांचे महत्त्व सांगणारा आहे. चला, आपण संकल्प करूया की कोविड-१९ सारख्या महामारीला आपण सत्यनिष्ठा आणि संयमाने पराजित करूया.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. ते त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणतात,

रामनवमीच्या मंगलमय शुभेच्छा. देशवासियांवर भगवान श्रीरामाची असीम अनुकंपा सतत राहू दे. जय श्रीराम

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील देशवासियांना ट्वीटरद्वारे रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणतात,

रामनवमीच्या महापर्वाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

संपूर्ण मानवजातीचे आदर्श मर्यादापुरूषोत्तम प्रभू श्रीराम यांची आपल्या सर्वांवर कृपादृष्टी अशीच राहू दे.

जय श्रीराम

आज श्रीरामनवमी असल्याने देशभरात मांगल्याचे वातावरण आहे. तरीही यावर्षीची रामनवमी कोरोनाच्या सावटात साजरी होत आहे. देशात वाढता कोरोना हा सर्वांसाठीच चिंतेचा विषय झाला आहे.

Exit mobile version