नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन: वाईटाचा वध करून सकारात्मकतेचा दिवस

नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन: वाईटाचा वध करून सकारात्मकतेचा दिवस

नरक चतुर्दशी हा दिवाळीच्या दिवसांतील एक महत्त्वाचा दिवस आहे. दर वर्षातील आश्विन कृष्ण चतुर्दशीस म्हणजेच अश्विन कृष्ण महिन्याच्या चौथ्या दिवशी नरक चतुर्दशी येते. या दिवशी पहाटे लवकर उठून शरीराला सुगंधी उटणे लावतात, त्यानंतर संपूर्ण शरीराला तेलाचे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पाप- वासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे असते.

नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी सुवासिक उटणे, तेल लावून स्नान केले जाते, त्यास ‘अभ्यंगस्नान’ असे म्हणतात.

नरक चतुर्दशी या दिवसाच्या संबंधित नरकासुर वधाची आख्यायिका खूप प्रचलित आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलमी राजवटीतून मुक्त केले होते, असे मानतात. नरकासुर आपल्या शक्तीचा गैरवापर करून देवता आणि ऋषींना त्रास देत होता. नरकासुराचा अत्याचार इतका वाढू लागला की, त्याने देव आणि संतांच्या १६ हजार महिलांना बंधक बनवले होते. नरकासुराच्या अत्याचाराने त्रस्त होऊन सर्व देव आणि ऋषी श्रीकृष्णाच्या आश्रयाला गेले. नरकासुराला एका स्त्रीच्या हातून मरण्याचा शाप मिळाला होता, म्हणून भगवान श्रीकृष्णाने आपली पत्नी सत्यभामेच्या मदतीने कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला नरकासुराचा वध करून त्याच्या बंदिवासातून सर्व १६ हजार स्त्रियांची मुक्तता केली.

हे ही वाचा:

जगाचा दबाव झुगारून भारताने ठरवले २०७० चे लक्ष्य

धनत्रयोदशी: दिवाळी खरेदीच्या उत्साहाचा दिवस!

‘वसुली कांड प्रकरणातील ही तर प्याद्याची अटक’

आदित्यजी बघा, करंज्यात १०० हून अधिक खारफुटीची झाली कत्तल!

सायंकाळी लक्ष्मीची पूजा करुन, घरासमोर सुशोभित रांगोळी काढून, घराला सजवून, फराळाचा नैवेद्य दाखवून अश्विन महिन्यातील अमावस्येस लक्ष्मीपूजन केले जाते.

लक्ष्मीपूजनाच्या द‌िवशी रात्रीच्या वेळी लक्ष्मी सर्वत्र संचार करते. ज्या ठिकाणी स्वच्छता, सकारात्मकता, आनंद, उत्साह यांचा वास असतो, तेथे लक्ष्मी प्रसन्न होऊन आशिर्वाद देते, असे मानले जाते. या दिवशी सायंकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते.

Exit mobile version