25 C
Mumbai
Thursday, November 28, 2024
घरधर्म संस्कृतीदशावतारी कलाकारांचे दुर्दैवाचे दशावतार थांबवा!

दशावतारी कलाकारांचे दुर्दैवाचे दशावतार थांबवा!

Google News Follow

Related

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन केली मागणी

कोरोनामुळे सध्या सर्वच कलाकारांची अवस्था बिकट झाली आहे. सिने, नाट्यक्षेत्र ठप्प झाल्यामुळे अभिनेते, कर्मचारी, पडद्यामागील कलाकार अशा सगळ्यांनाच संकटाचा सामना करावा लागतो आहे. याच निमित्ताने कोकणभूमीमधील दशावतार कलावंतांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी त्यांच्या मागण्या समजून घेतल्या व सांस्कृतिक विभागाचे मंत्री अमित देशमुख यांनी या कलेला अनुदान कसे देता येईल, यासंबंधी निर्णय घेऊन कोकणातील खऱ्या अर्थाने कला जोपासणाऱ्या कलावंतांना अनुदान देण्यासाठी सूचना दिल्या. यावेळी मालवणी हास्यसम्राट दिगंबर नाईक आणि इतर कलावंत उपस्थित होते.

हे ही वाचा:

या मुख्यमंत्र्याला विठ्ठल माफ करणार नाही

बापरे! कळव्यात दरड कोसळली; एकाच घरातील पाच जण दगावले

युपीए काळात टॅप केले गेले तब्बल ९,००० फोन

उल्हास नदीला पूर, ठाणे जिल्हा जलमय होण्याची भीती

दशावतार या कला प्रकारचे अनुकरण करून संगीत, रंगभूमीचा उदय झाला आणि आज याच कलेला अनुदान नाही मात्र रंगभूमीच्या प्रत्येक विभागाला शासनाचे अनुदान आहे.परंतु रंगभूमीची ही मातृत्व कला असलेला दशावतार मात्र अजून या अनुदानापासून वंचित आहे, असे आम्ही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना सांगितल्याचे दिगंबर नाईक यांनी सांगितले. त्यानुसार राज्यपालांनी संबंधित विभागाचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्याशी बोलून यावर उपाययोजना करावी व खऱ्या अर्थाने या कोकण भूमीतील दशावतार कलावंतांना न्याय द्यावा, अशी सूचना दिली त्यांनीही लवकरच त्याना न्याय देऊ असे आश्वासन दिले.

यावेळी मालवणी हास्य सम्राट दिगंबर नाईक, दत्तमाऊली पारंपारिक दशावतार लोककला शिक्षण, प्रशिक्षण, बहुउद्देशीय मंडळ,सिंधुदुर्ग येथील कलावंत सीताराम मयेकर,दत्तप्रसाद शेणई,संतोष रेडकर,आशिष गावडे, रुपेश नेवगी, दशावतार हितवर्धक नाट्य संस्थेचे अध्यक्ष आशिष गावडे,कोषाध्यक्ष रतन परब आदी उपस्थित होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
200,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा