बाप्पाला सुखरूप घरी पाठवणारे कोळी बांधव मानधनाविना!

बाप्पाला सुखरूप घरी पाठवणारे कोळी बांधव मानधनाविना!

गणेशोत्सवात बाप्पाला निरोप देताना बाप्पाची मूर्ती खोल पाण्यात नेऊन विसर्जित करणाऱ्या कोळी बांधवांना कोणतेही मानधन मिळत नाही. दीड, पाच, सात, नऊ आणि दहा दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनासाठी सकाळपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत गणेश घाटावर सेवा देणारे कोळी बांधव मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत. विसर्जनासाठी मूर्तीबरोबर मिळणाऱ्या दक्षिणेवरच त्यांना समाधान मानावे लागत आहे.

गणेशोत्सवात कोळी बांधव तराफ्यावर मोठ्या आणि छोट्या मूर्ती ठेऊन त्या खोल पाण्यात विसर्जनासाठी नेतात. एका मूर्तीच्या विसर्जनासाठी भक्तांकडे ५१ रुपयांची मागणी केली जाते. अनेकदा भक्त श्रद्धेने त्यांना १०० किंवा ५०० रुपयेही स्वखुशीने देतात. मात्र, कोळी बांधवांना याच दक्षिणेवर समाधान मानावे लागते. विसर्जनासाठी पालिकेकडून काही एजन्सीमार्फत स्वयंसेवक ठेवले जातात. हे स्वयंसेवक आणि कोळी बांधव ५१ रुपयाच्या दक्षिणेवर मूर्ती पाण्यात विसर्जित करतात. पालिकेकडून एजन्सीमार्फत नेमलेल्या स्वयंसेवकांना मानधन दिले जाते, पण कोळी बांधवांना कोणताही मोबदला मिळत नसल्याची तक्रार कोळी बांधवांनी केली आहे.

हे ही वाचा:

सप्टेंबर अखेरपर्यंत असेल पावसाचा डेरा

चीनला इशारा देणारा ‘ऑकस’ सैन्य करार आहे तरी काय?

‘उद्धवजी, अनैसर्गिक आघाडी केल्याचे आता लक्षात येत असेल ना?’

मोदींचा चेहरा आणि शिवसेनेतील फाटके मुखवटे

प्रशासनाकडून भाविकांच्या सोयीसाठी विसर्जन घाटावर स्वयंसेवक तैनात करण्यासाठी एजन्सी नेमली जात असून या एजन्सीकडून कोळी बांधवांनाच स्वयंसेवक म्हणून नेमले जात असल्याने त्यांना मानधन मिळत असल्याचे अग्निशमन दलाने ‘म. टा. वृत्तसेवे’शी बोलताना सांगितले. आता ठेकेदार नेमके स्वयंसेवक म्हणून मानधन कोणाला देतो, हा प्रश्न उपस्थित राहिला आहे.

कोळी बांधवांकडेही घरात गणपती बसवले जातात. मात्र गणपतीच्या दुसऱ्या दिवसापासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत हे कोळी बांधव गणपती विसर्जानात गुंतलेले असल्याने त्यांच्या बाप्पाचे विसर्जन १५ व्या किंवा १७ व्या दिवशी केले जाते.

Exit mobile version