बॉडी बॅग कथित घोटाळा प्रकरणी ईडीकडून किशोरी पेडणेकर यांची ६ तास चौकशी

गुरुवारी सकाळी ११ वाजता पेडणेकर ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाल्या होत्या

बॉडी बॅग कथित घोटाळा प्रकरणी ईडीकडून किशोरी पेडणेकर यांची ६ तास चौकशी

बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी गुरुवारी सकाळी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झालेल्या मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी तब्बल सहा तास चौकशी करून सोडून दिले. चौकशी दरम्यान बॉडी बॅग प्रकरणात आपण कोणावरही दबाव आणला नसल्याचे त्यांनी म्हटले असल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे.

 

कोव्हिड काळात मुंबई महानगर पालिकेत झालेल्या बॉडी बॅग खरेदी घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लॉडरिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॉडी बॅग घोटाळा प्रकरणात ईडीने गेल्या आठवड्यात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे चौकशीसाठी त्यांना समन्स बजाविण्यात आले होते.

 

गुरुवारी सकाळी ११ वाजता पेडणेकर ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाल्या होत्या. ईडीच्या अधिकारी यांनी बॉडी बॅग खरेदी घोटाळा प्रकरणाशी संबंधित पेडणेकर यांच्या कडे तब्बल सहा तास चौकशी करण्यात आली. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा तासांहून अधिक चौकशी दरम्यान पेडणेकर यांना बॉडी बॅग खरेदीतील अनियमिततेशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपां संदर्भात अनेक प्रश्न विचारण्यात आले काही प्रश्नाची उत्तरे पेडणेकर यांनी टाळली असून अधिकारी यांच्यावर कुठलाही दबाव टाकण्यात आला असल्याचे पेडणेकर यांनी नाकारले आहे.

हे ही वाचा:

मोदींबद्दलच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर राहुल गांधींना नोटीस!

अंधारेबाईना अचानक का आला भुजबळांचा कळवळा?

जम्मू काश्मीरमध्ये २ दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या!

मोसाद निघणार हमास दहशतवाद्यांच्या शोधात!

मेसर्स वेदांत इनोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला कंत्राट देण्याच्या सूचना करण्याच्या भूमिके बद्दल आणि बॉडी बॅगच्या कथित किमतीतील संशयास्पद सहभागाबद्दल पेडणेकर यांना प्रश्न विचारण्यात आले. परंतु पेडणेकर यांनी मनपा अधिकार्‍यांना कोणतेही कॉल केल्याचे किंवा कंपनीला कंत्राट देण्यासाठी कोणत्याही अधिकार्‍यावर दबाव आणल्याचे ठामपणे नाकारले

Exit mobile version