‘केरळचे राज्यपाल आरिफ खान प्रभू राम चरणी नतमस्तक’

प्रभू रामाची पूजा करणे ही अभिमानाची गोष्ट, आरिफ खान

‘केरळचे राज्यपाल आरिफ खान प्रभू राम चरणी नतमस्तक’

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी बुधवारी (८ मे) अयोध्येतील राममंदिराला भेट देऊन राम लल्लाच्या मूर्तीसमोर नतमस्तक झाले.अयोध्येतील महर्षि वाल्मिकी विमानतळावर पोहोचल्यानंतर ते रामललाच्या दरबारात पोहोचले, येथे त्यांनी रामललाकडे अगदी मनापासून पाहिले नाही तर त्यांनी रामललाच्या दरबारात गुडघे टेकले आणि आपल्या भावना श्रीरामाला समर्पित केल्या.राज्यपालांनी स्वतः ट्विट करत याची माहिती दिली.

प्रभू रामांचे दर्शन घेतल्यानंतर राज्यपाल आरीफ मोहम्मद खान म्हणाले की, मी जानेवारीमध्ये दोनदा अयोध्येला आलो आहे, त्या वेळी जी भावना होती तीच भावना आजही आहे.अयोध्येत येणे आणि प्रभू रामाची पूजा करणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे राज्यपाल आरीफ मोहम्मद खान म्हणाले.प्रभू रामांपुढे नतमस्तक होत असतानाचा व्हिडिओ देखील त्यांनी शेअर केला आहे.प्रभू रामांच्या जयघोषात दर्शन घेत असल्याचे व्हिडिओमध्ये राज्यपाल दिसत आहेत.

हे ही वाचा:

आता गांजा लावून पाकिस्तान गाठणार आर्थिक उच्चांक

मालदीवची अक्कल ठिकाण्यावर आली; भारतीयांसाठी पायघड्या

चारधाम यात्रेला दणदणीत प्रतिसाद

भारताच्या लोकसंख्येमध्ये हिंदू धर्मियांत आठ टक्के घट; अल्पसंख्याकांत वाढ!

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ जानेवारी रोजी प्रभू रामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला.त्यानंतर सर्व भाविकांना मंदिर खुले करण्यात आले.मोठ्या संख्येने भाविक प्रभू रामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत गर्दी करत आहेत.

 

Exit mobile version