हिजाब हा इस्लामचा भाग नाही; केरळचे राज्यपाल आरिफ खान यांचे परखड मत

हिजाब हा इस्लामचा भाग नाही; केरळचे राज्यपाल आरिफ खान यांचे परखड मत

देशभरात हिजाबवरून सुरू असलेल्या वादावर केरळचे राज्यपाल मोहम्मद आरिफ खान यांनी जोरदार हल्लाबोल करत हिजाब हा इस्लामचा भाग नाही असे परखड मत व्यक्त केले आहे. शीख व्यक्तीला फेटा घालणे जसे अनिवार्य असते तसे मुस्लिम महिलांना हिजाब घालणे सक्तीचे नाही.

मोहम्मद आरीफ खान यांनी विविध वाहिन्यांना मुलाखती दिल्या. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की, विद्यार्थीनींनी पुन्हा शाळेत परतावे आणि शिक्षण घ्यावे. हिजाब हा इस्लामचा भाग नाही. हिजाबचा कुराणमध्ये सातवेळा उल्लेख आहे, पण त्याचा संबंध महिलांच्या वेशाशी नाही. मुस्लिम महिलांना प्रगती करण्यापासून रोखण्याचे हे कारस्थान आहे. आज मुस्लिम महिला शिक्षण घेत आहेत आणि आपल्याला हवे ते ध्येय गाठत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी क्लासरूममध्ये परतावे आणि शिक्षण घ्यावे.

आरिफ खान म्हणाले की, शीखांसाठी पगडी अनिवार्य आहे पण इस्लाममध्ये हिजाब अनिवार्य नाही आणि कुराणमध्येही तसे कुठे म्हटलेले नाही. त्यात केवळ असा उल्लेख आहे की, तुम्हाला दुसऱ्याशी बोलायचे असेल तर मध्ये पडदा असला पाहिजे. महिलांना काहीही घालण्याची भारतात परवानगी आहे पण जिथे त्या शिक्षण घेत आहेत, तिथे त्यांना त्या नियमांचे पालन करावेच लागेल.

हे ही वाचा:

जयप्रभा स्टुडिओमध्ये लता मंगेशकर यांचे स्मारक उभारण्यावरून वाद

शेट्टी बहिणींना आणि त्यांच्या आईला न्यायालयाचे समन्स

Tata IPL 2022 Mega Auction: ‘या’ होत्या पहिल्या दिवशीच्या महत्वाच्या घडामोडी

एबीजी शिपयार्डचा २२ हजार कोटींचा घोटाळा

 

कर्नाटकातील उडुपीमध्ये एका ज्युनियर कॉलेजात हिजाब घालण्याचा हट्ट काही मुलींनी धरण्यावरून प्रकरण पेटले आणि आता देशभरात हिजाबच्या मागणीसाठी आंदोलने सुरू आहेत. महाराष्ट्रात बीड, मालेगाव, नवी मुंबई, पुणे येथे आंदोलने झाली आणि त्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षांनीही हिजाबचे समर्थन केले.

 

Exit mobile version