केदारनाथ धामचे भाविकांसाठी दरवाजे उघडण्यात आले आहेत. शुक्रवार, ६ मे पासून म्हणजेच आजपासून भाविकांना बाबांचे दर्शन घेता येणार आहे. सकाळी वैदिक मंत्रोच्चाराने केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले आहे. यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी देखील उपस्थित होते. मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने पहिली पूजा करण्यात आली आहे.
मंदिराला पंधरा क्विंटल फुलांनी सजवण्यात आले होते. केदारनाथ धामचे दरवाजे उघडण्याच्या वेळी तब्बल दहा हजारांहून अधिक भाविक उपस्थित होते. केदारनाथ धाम दोन वर्षांनंतर सर्वसामान्यांसाठी खुले झाले आहे. आजपासून दररोज बारा हजार भाविकांना दर्शन घेता येणार आहे. संपूर्ण केदारनाथ धाम हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे.
चार धाम यात्रा ३ मे पासून सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडण्यात आले. आजपासून केदारनाथ धामचे दरवाजे उघडल्याने भाविक आणि यात्रेकरूंचा मोठा मुक्काम पूर्ण होणार आहे. ८ मे रोजी बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडल्याने भाविकांना चार धामची यात्रा पूर्ण करता येणार आहे.
हे ही वाचा:
राज्यातील २८व्या महापालिकेची घोषणा
जम्मू-काश्मीरमध्ये सीमेलगत आढळले भुयार
‘कोरोना संपताच CAA लागू होणार’
२०२४ साली इस्रो करणार ‘शुक्र’ मोहीम
महामारीनंतर दोन वर्षांनी भाविकांसाठी केदारनाथचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. आगमनासाठी बाबा केदार यांचे धाम १५ क्विंटल फुलांनी सजवण्यात आले होते. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि दहा हजार भाविकांनी केदारनाथचे दरवाजे उघडल्यानंतर पूजा केली आहे. पहिल्या दिवशी केदारनाथ दर्शनासाठी १२ हजार भाविकांनी नोंदणी केली. तब्बल दोन वर्षांनंतर या वेळी चारधाम यात्रेत विक्रमी भाविक येण्याची शक्यता आहे. ३१ मेपर्यंत एक लाख ९० हजारांहून अधिक भाविकांनी नोंदणी केली आहे, तर केदारनाथसाठी हेली सेवांची आगाऊ बुकिंग ५ जूनपर्यंत झाली आहे.