मशीद आणि कानिफनाथ मंदिराचा वाद उफाळला; आरती करण्यास दिला नकार

प्रशासनाने अचानक आरती न करण्याचे आदेश काढले

मशीद आणि कानिफनाथ मंदिराचा वाद उफाळला; आरती करण्यास दिला नकार

अहमदनगर येथील गुहा गावातील कानिफनाथ मंदिरात आरती करण्यास मनाई केल्यामुळे स्थानिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या मंदिराच्या परिसरात असलेल्या मशिदीमुळे तिथे आरती करण्यास प्रशासनाने मनाई केल्याचे हे प्रकरण असून स्थानिकांमध्ये त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. या मंदिरात दर गुरुवारी आरती होते पण यावेळी प्रशासनाने अचानक आरती न करण्याचे आदेश काढले आणि जमावबंदी केली. त्यामुळे स्थानिकांमध्ये संताप उसळला.

सध्या हे मंदिर आणि मशिद प्रकरण न्यायालयात आहे. प्रशासनाने स्थानिकांच्या भावना समजून घेण्यापेक्षा थेट आरतीलाच विरोध केल्यामुळे लोकांमध्ये राग आहे. प्रशासनाचा निषेध करण्यासाठी लोकांनी इथे ठिय्या आंदोलन केले. मोठ्या संख्येने लोकांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला आणि आरतीला विरोध करणाऱ्या प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.

हे ही वाचा:

करून गेले उद्धवराव आणि नाना पटोलेंचे नाव…

भय इथले संपत नाही.. मृतांची संख्या १६,००० च्या पुढे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी दाखवणार वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा

कोपरीमुळे कोंडी फुटणार!

कानिफनाथ मंदिराच्या नावे ४० एकर जमीन आहे. पण या जागेविषयी कल्पना न देता ती वक्फ बोर्डाकडे वर्ग करण्यात आली. शिवाय, त्यातील मंदिराचे नाव हटवून हजरत रमजान बाबा दर्गा असे नावही त्याठिकाणी बदलण्यात आले. त्याविरोधात ग्रामस्थांनी न्यायालयीन लढा सुरू केला आहे. प्रकरण न्यायप्रवीष्ट असतानाही प्रशासनाने कानिफनाथ मंदिरात आरती करण्यास नकार का दिला असा ग्रामस्थांचा सवाल आहे.

यासंदर्भात प्रशासनाकडून मात्र कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. गेल्या महिन्यातही येथे कानिफनाथ मंदिरात आरती व महाप्रसादाच्या कार्यक्रमास विरोध करण्यात आला होता. त्यावेळी परिस्थिती चिघळली होती. त्यामुळे तेथील हनुमान मंदिरात ग्रामस्थांनी एकत्र येत आरती करणारच अशी भूमिका घेतली होती. आरतीनंतर आणलेला प्रसाद मंदिरापर्यंत नेण्यास मज्जाव करण्यात येत होता. त्यासाठी महिलांना पुढे करण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत प्रकरण हाताळले होते.

Exit mobile version