गुरू गोविंदसिंह हे शीखांचे १०वे गुरू त्यांचे पुत्रे साहिबजादे जोरावरसिंह आणि फतेहसिंह यांना २६ डिसेंबर १७०४मध्ये औरंगजेबाच्या आदेशावरून भिंतींमध्ये चिणून मारण्यात आले. त्यांच्या त्यागाचे, बलिदानाचे स्मरण म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा दिवस वीर बाल दिवस म्हणून ओळखला जावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून २६ डिसेंबर या दिवसाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
गुरू गोविंदसिंह यांना चार पुत्र होते. हे चारही पुत्र मुघलांच्या सत्तेपुढे शरण न जाता मृत्युला सामोरे गेले. त्यांच्या या अद्वितिय बलिदानाचे स्मरण आजही केले जाते. गुरू गोविंदसिंह यांना अजितसिंह, झुझार सिंह, जोरावर सिंह आणि फतेह सिंह असे चार पुत्र होते. लहान वयातच त्यांनी आपल्या धर्मासाठी बलिदान दिले. त्यांना चार साहिबजादे असे म्हटले जाते.
अजित सिंह हे वयाच्या १८व्या वर्षी शहीद झाले. ७ डिसेंबर १७०५ मध्ये चमकौर येथील मुघलांविरुद्धच्या युद्धांत त्यांनी प्राणार्पण केले. झुझार सिंह यांनी तर वयाच्या १४व्या वर्षी प्राणत्याग केला. या युद्धातच तेही शहीद झाले.
हे ही वाचा:
सुनील गावस्कर यांच्या मातोश्रींचे निधन
संजय राऊत यांचे योगदान आणि प्रतिकांची चोरी
त्या जुन्या व्हीडिओंचे हिशेब अंधारेबाई देतील काय?
संजय राऊत यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान काय?
झोरावर सिंह आणि फतेह सिंह यांना पकडण्यात आले. त्यांची आई गुजरी यांनाही ताब्यात घेण्यात आले. औरंगजेबाच्या आदेशानुसार त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्याची सक्ती करण्यात आली पण धर्माभिमानी असलेल्या या मुलांनी त्यास नकार दिला. तेव्हा त्यांच्याभोवती भिंत बांधून त्यांना चिणून मारण्यात आले. हे दोघेही अनुक्रमे ९ आणि ६ वर्षांचे होते. गुरु गोविंद सिंह यांचीही हत्या त्यानंतर १७०८मध्ये करण्यात आली. औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर वर्षभराने गोविंदसिंह यांना मारण्यात आले होते. अशाप्रकारे या कुटुंबातील सगळे धर्मासाठी, स्वराज्यासाठी मृत्युला सामोरे गेले.