25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरधर्म संस्कृतीपॅरिस ऑलिम्पिकमध्ये येशूची थट्टा; टीकेची झोड, भारतात ठरले असते अभिव्यक्ती स्वातंत्र्य

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये येशूची थट्टा; टीकेची झोड, भारतात ठरले असते अभिव्यक्ती स्वातंत्र्य

विचारवंत, सेलिब्रिटींकडून टीका

Google News Follow

Related

भारतात देवीदेवतांची थट्टा उडवणे ही फॅशन बनली आहे. तशी थट्टा उडवणे म्हणजे आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचे दाखवले जाते. सध्या पॅरिसमध्ये सुरु झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमात येशु ख्रिस्ताची थट्टा उडवल्याचा आरोप केला गेला. सोशल मीडियावर त्यावरून प्रचंड टीका होत आहे. पण तिथे ही थट्टा उडवणे हे आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचे मात्र कुणीही म्हटलेले नाही.

पॅरिसला सुरू झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमात येशू ख्रिस्ताच्या अखेरच्या भोजनाच्या प्रसंगाची चेष्टा केल्याचे म्हटले जात आहे. येशू ख्रिस्त आणि त्याचे १२ दूत हे स्त्री वेशात दाखवण्यात आल्याची टीका होत आहे.

ऑलिम्पिक आयोजकांनी यावर प्रतिक्रिया दिली नसली तरी सोशल मीडियावर उदघाटन कार्यक्रमातील या नाट्यावर टीका होत आहे. दा विंची या चित्रकाराने येशू ख्रिस्ताच्या त्या भोजन प्रसंगाचे चित्र काढले होते. त्याच पद्धतीने एका निळ्या वेशातील जाडजूड महिला डोक्यावर मुकुट धारण करून मध्यभागी बसलेली दिसते आणि तिच्या शेजारी महिलांच्या वेशात काही लोक दिसतात. ते नाट्य त्या येशूच्या अखेरच्या भोजन प्रसंगासारखे दिसत असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

हे ही वाचा:

काँग्रेस आमदाराने विधानसभा अध्यक्षांबद्दल वापरले अपशब्द

बंगळूरूमधील वसतिगृहात तरुणीची गळा चिरून हत्या करणाऱ्याच्या मध्य प्रदेशातून आवळल्या मुसक्या

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात भारताचा दिमाख

गिरगावची ऐतिहासिक ओळख जपण्यासाठी ‘हिंदू मंदिर बचाव अभियाना’त सहभागी होण्याचे आवाहन

मस्क यांचीही टीका

हे नाट्य तयार करून खिश्चन धर्माचा अपमान केला गेला आहे अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. एलन मस्क यांनीही यावर टीका केली असून हे जगातील सगळ्या ख्रिश्चनांचा अपमान आहे, अशी भावना व्यक्त केली. एनएफएलचा फुटबॉल खेळाडू हारिसन बटकर याने म्हटले आहे की, देवाची अशा पद्धतीने थट्टा उडवणे योग्य नाही.

पत्रकार निक सॉर्टर यांनीही या कृतीवर टीका केली आहे. ऑलिम्पिकमध्ये हे काय चालले आहे असा सवाल त्यांनी विचारला.

एकूणच जगभरात या कृतीवरून प्रचंड टीका झाली, पण ही कृती योग्य होती असे कुणी म्हटले नाही. किंवा या थट्टेचे समर्थन कुणी केले नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा