जम्मू काश्मीरमधील जवानही रंगात न्हाऊन निघाले

जम्मू काश्मीरमधील जवानही रंगात न्हाऊन निघाले

देशभरात होळीचा आणि रंगपंचमीचा उत्साह असतानाच आता सैनिकांनी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. जवानांच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये जम्मू आणि काश्मीरमधील सैनिक आनंदात रंगपंचमी सण साजरा करत आहेत. जम्मू- काश्मीरमधील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफ जवानांनी होळी खेळली.

हे जवान गाणी गात, नृत्य करताना दिसत आहेत. तर एकमेकांना रंग लावून आनंद व्यक्त करत आहेत. काही जवान वेगवेगळी वाद्ये वाजवत आहेत. बीएसएफच्यावतीनेही ट्विट करत देशवासियांना धुलिवंदनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘सर्व देशवासियांना महासंचालक, सीमा सुरक्षा दल आणि सर्व सीमा रक्षकांच्या वतीने होळीच्या शुभेच्छा. सीमा सुरक्षा दल – सदैव सतर्क’

हे ही वाचा:

२०२४ ला होणार नवरा विरुद्ध बायको लढत

जावेद भाई और सलीम भाई का मिलन जल्द

शिवसेनेचे सभासद कार्ड, पैसे उकळले मनसेच्या नावाने?

चिदंबरम म्हणाले, मी प्रियांका गांधींना आधीच सांगितले होते, पण…

दरम्यान आज संपूर्ण देशभरात होळीचा आणि रंगपंचमीचा उत्साह पाहायला मिळाला. गेली दोन वर्षे देशभरात कोरोना महामारीमुळे अनेक निर्बंध लागू होते. मात्र, यंदाच्या वर्षी निर्बंध लागू नसल्यामुळे नागरिकांनी एकत्र जमून हा उत्सव साजरा केला. अनेक राजकीय नेत्यांनीही होळी साजरी करत रंगपंचमी साजरी केली. मुंबईत दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क येथे तरुणाईने एकत्र जमून धुळवड साजरी केली. तर नागपूर, पुणे या शहरांमध्येही मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी झाली.

Exit mobile version