आता जम्मू-काश्मीरमध्येही ‘गोविंदा-गोविंदा’

आता जम्मू-काश्मीरमध्येही ‘गोविंदा-गोविंदा’

जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच भगवान वेंकटेश्वराचे मंदिर उभारले जाणार आहे. जम्मू-काश्मीरचे नायाब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या मंदिराच्या बांधणीला मान्यता दिली आहे. त्यासाठी नायाब राज्यपालांच्या मार्फत जमिनही देण्यात आली आहे. गुरूवारी या मंदिरासाठी जमिन देण्याच्या प्रस्तावाला मनोज सिन्हा यांनी मान्यता दिली आहे. हे मंदिर तिरूपती येथील प्रसिद्ध देवस्थानाची प्रतिकृती असणार आहे.

जम्मू-काश्मीरचे नायाब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या नेतृत्वातील ॲडमिनीस्ट्रिटीव्ह काऊंसीलच्या बैठकीत या वेंकटेश्वर मंदिराला परवानगी दिली आहे. या मंदिरासाठी 62 एकर इतकी जागा देण्यात आली आहे. ही जमीन ४० वर्षांसाठी लिजवर देण्यात येणार आहे. तिरूमला तिरूपती देवस्थानाला ही जमिन देण्यात आली आहे. तिरूपती देवस्थान या जमिनीवर मंदिर आणि त्या अनुषंगाने इतर बांधकाम करणार आहे.

हे ही वाचा:

“रक्ताचा खेळ यापुढे चालणार नाही”- मोदींचा दीदीला इशारा

शेतकरी आंदोलक लवकरच संसदेवर मोर्चा आयोजित करणार

सुपररस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

या मंदिर परिसरात वेदपाठशाळा, ध्यानकेंद्र, भक्तनिवास, आरोग्य सुविधा तसेच शैक्षणिक सुविधांची निर्मिती करण्यात येणार आहे. या मंदिराच्या स्थापनेमुळे या भागातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. तर स्थानिक नागरिकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

तिरूमला तिरूपती देवस्थान हा स्वतंत्र ट्रस्ट असून १९३२ सालच्या तिरूमला तिरूपती देवस्थान कायद्या अंतर्गत त्याची स्थापना करण्यात आली आहे. हा ट्रस्ट सांस्कृतिक, अध्यात्मिक क्षेत्रातील कार्यासाठी आणि दानकार्यासाठी प्रसिद्ध आहे. जम्मू-काश्मीर सोबतच वारणसी आणि मुंबई सारख्या शहरातही भगवान व्यंकटेशांचे मंदिर उभारण्याचा तिरूपती देवस्थानचा मानस आहे.

मोदी सरकारने कठोर पावले उचलत जम्मू-काश्मीरमधील अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर काश्मिर खोऱ्यात अनेच सकारात्मक बदल घडताना दिसत आहेत. या भागाच्या विकासाला चालना मिळत आहे. 

Exit mobile version