जमियत उलेमा ए हिंदचे अध्यक्ष मेहमूद मदानी यांनी शुक्रवारी केलेल्या काही विधानांमुळे खळबळ उडाली आहे. नवी दिल्लीतील रामलिला मैदानात झालेल्या जमियतच्या कार्यक्रमात मौलाना मदानी म्हणाले की, भारत हा आमचा देश आहे. हा देश मेहमूद मदानी यांचा आहे जेवढा तो नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांचा आहे. मेहमूद त्यांच्यापेक्षा एक इंच पुढे नाही किंवा ते मेहमूदपेक्षा एक इंच पुढे नाहीत.
त्यांनी हे वक्तव्य करताना त्यात राजकारण आणण्याचा प्रयत्न केलाच पण पुढच्या वक्तव्यात इस्लाम हा कसा इतर धर्मांपेक्षा सर्वात जुना धर्म असल्याचेही ते म्हणाले. ते म्हणाले की, भारत ही मुस्लिमांची जन्मभूमी आहे. इस्लाम हा भारताबाहेरून आलेला धर्म आहे, असे जे म्हटले जाते ते सर्वस्वी खोटे आहे. सर्व धर्मांत इस्लामच सर्वात जुना धर्म आहे. हिंदी मुस्लिमांसाठी भारत ही योग्य भूमी आहे.
हे ही वाचा:
मुंबईवरून ‘एक्सप्रेस वे’ने २४ नाही तर १२ तासांत गाठा दिल्ली
राष्ट्रवादीला अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याचे डोहाळे.. पण शरद पवार म्हणाले
फिरकीच्या जाळ्यात कांगारू फसले; भारताचा डावाने विजय
महान दूरदर्शी व्यक्तिमत्व पंडित दीनदयाळ उपाध्याय
जमियतचे प्रमुख मेहमूद यांनी सांगितले की, जे जबरदस्तीने धर्मांतर करत आहेत, त्यांच्या आपण विरोधात आहोत. धर्म पाळण्याचा अधिकार हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. नमाझवर बंदी घालणे किंवा बुलडोझरचा वापर करणे यावरही मेहमूद यांनी टीका केली.
जमियतच्या या कार्यक्रमात समान नागरी कायदा, मुस्लिम पर्सनल लॉ, मदरशांची स्वायत्तता या मुद्द्यांवर चर्चा झाली. सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्यांसाठी आरक्षण असावे असा प्रस्ताव आणायला हवा, असेही मत यावेळी व्यक्त झाले.