इतिहासकार पांडुरंग बलकवडे यांनी काढले उद्गार
गेले काही दिवस शिवशाहीर महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे आणि जेम्स लेन यांच्यावरून महाराष्ट्रात गदारोळ माजलेला असताना इतिहासकार पांडुरंग बलकवडे यांनी यासंदर्भात काही तथ्य मांडून खोटा प्रचार करणाऱ्यांची पोलखोल केली आहे. शरद पवार यांनी अनेकवेळा जाहीर कार्यक्रमांत बाबासाहेब पुरंदरे यांचा सत्कार केला, कौतुक केलं ते आज त्यांच्याविरोधात वक्तव्ये का करतात, असा सवाल बलकवडे विचारतात, तसेच तत्कालिन महाराष्ट्र सरकारने (काँग्रेसचे सरकार) जेम्स लेनच्या शिवाजी : द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकावर बंदी आणण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतलेली असताना या पुस्तकासंदर्भात माफी मागणारे तसेच पुस्तक मागे घेण्याची तयारी दाखविणारे पत्रच सादर केले नाही, याचे कारण काय असाही प्रश्न ते उपस्थित करतात.
एबीपी माझाला दिलेल्या मुलाखती ते म्हणतात की, आम्ही म्हणजे बाबासाहेब पुरंदरे, जयसिंगराव पवार, वसंतराव मोरे, निनाद बेडेकर, ग. भा. मेंहेंदळे, डॉ. शिवदे अशा काही इतिहासकारांनी या पुस्तकासंदर्भात ऑक्सफर्ड प्रकाशन संस्थेला पत्र लिहून नाराजी कळविली होती. तेव्हा त्यांनी पुस्तके मागे घेण्याची तयारी दर्शविली तसेच माफीही मागितली पण जेव्हा महाराष्ट्र सरकारने पुस्तकावरील बंदीसाठी उच्च न्यायालयात दावा दाखल केला तेव्हा ऑक्सफर्डने पुस्तक बंदीचे दिलेले आश्वासन किंवा मागितलेली माफी ही पत्रेच सादर केली नाहीत.
बलकवडे म्हणतात की, जेव्हा या पुस्तकातील आक्षेपार्ह मजकुराबद्दल आम्हाला समजले तेव्हा आम्ही ऑक्सफर्डला पत्र लिहिले. पण इथे संभाजी ब्रिगेडने या पुस्तकातील आक्षेपार्ह लेखनाच्या प्रती काढून त्या वितरित केल्या. त्यातून संभाजी ब्रिगेडला काय साध्य झाले ठाऊक नाही. पुरंदरेंना बदनाम करण्याचा त्यांचा यामागे हेतू होता, हे स्पष्ट झाले आहे.
जेम्स लेन अजूनही जिवंत
बलकवडे यांनी सांगितले की, लेनची मागणी वैचारिकतेला, इतिहासाला धरून नाही. शिवाजी महाराजांच्या जन्माविषयी, जिजाऊंबद्दल त्याने लिहिलेली वक्तव्ये मराठी माणसाला दुखावणारी व इतिहासाला धरून नसलेली होती. गैरलागू होती. खरे तर जेम्स लेन अजूनही जिवंत आहे. शिवछत्रपतींची बदनामी करणाऱ्याला इथे भारतात बोलावून त्याच्यावर खटला दाखल करायला हवा होता, अशी मागणीही बलकवडे यांनी केली आहे.
हे ही वाचा:
‘द काश्मीर फाइल्स’ नंतर आता येणार ‘द दिल्ली फाइल्स’!
लता मंगेशकर पुरस्कार आणि पुरोगाम्यांचे रडगाणे
अबब!! ‘KGF- Chapter 2’ची केवढी ही कमाई
लव्ह जिहादवरून डाव्यांमध्ये फुटाफूट
बलकवडे म्हणाले की, ज्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेत लेन काहीकाळ राहिला होता, त्या संस्थेचा शिवअभ्यासाशी काही संबंध नाही. त्यामुळे त्यांच्या कुणाही विद्वानाने लेनला शिवछत्रपतींविषयी माहिती देण्याची शक्यताच नाही.
लेनसारख्या परकीय व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांवर पुस्तक लिहिल्यावर पुरंदरेंना त्याचे कौतुक वाटले असेल पण त्याने काय लिहिले आहे हे त्यांना माहीत नव्हते. पण नंतर जेव्हा ते वाचले तेव्हा त्यांना हे पुस्तक भयंकर वाटले. एकूणच त्या पुस्तकाची मांडणी आरएसएसने शिवाजी महाराजांना हिंदुत्ववादी केलं, असं सांगणारी होती. महाराजांचा हिंदुत्वाशी काही संबंध नाही. आरएसएसला विरोध करण्यासाठी हे पुस्तक लिहिलं गेलं.
हायकोर्टातील निकाल लागल्यावर पवार आणि डाव्या संघटनेचे सीताराम येचुरी यांनी पत्रकार परिषद घेतली. वादग्रस्त ओळी वगळून ते पुस्तक बाजारात आलं तर त्याला आमची हरकत नाही असही त्या म्हणाल्या. तेव्हा प्रश्न येतो की हे पुस्तक त्यांना अपेक्षित मांडणीने लिहून घेतले असले पाहिजे. साम्यवादी मंडळींनी प्रेरणा दिली असेल लेनला. त्यांच्या विचारसरणीला मान्यता देणारे लेखन लेन करतो.