तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी सनातन धर्माबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर भाजप आक्रमक झाला आहे. भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही पत्रकार परिषद घेऊन यावर तीव्र शब्दांत टीका केली. ‘उदयनिधी हे सनातन धर्म समूळ नामशेष करण्याचे आवाहन करत असताना ते कागद वाचून दाखवत होते. हा कागद त्यांना कोणी दिला?’, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
‘असे वक्तव्य करून केवळ सनातन धर्माचा अवमान नव्हे तर द्वेष पसरवला जात आहे. हे प्रेमाच्या नावावर द्वेषाचा प्रसार करत आहेत. हे पूर्णपणे द्वेषप्रचारकी भाषण आहे. एखाद्या धर्माला भडकवण्याचा प्रकार आहे,’ अशी टीकाही त्यांनी केली. यांचा अजेंडा सनातन धर्माचे समूळ उच्चाटन करण्याचा आहे, असा दावाही त्यांनी केला.
‘विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ गटाला भारताशी काहीही देणेघेणे नाही. हे सेंगोल समाजाला विसरले आहेत. मात्र आमच्या सरकारने तमिळ सेंगोल समाजाला आपलेसे करून तमिळ संस्कृतीच्या संरक्षणाचे काम केले आहे. मोदीजींनी चीनच्या राष्ट्रपतींना बहाबलीपूरम येथे आमंत्रित करून त्यांना तमिळ संस्कृतीचे दर्शन घडवले आहे. माझ्या मते, काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांचे मुखवटा गळून पडला आहे. त्यांचा अजेंडा स्पष्ट आहे, हिंदू धर्माचा समूळ नाश करणे, सनातन धर्माचा समूळ नाश करणे… हाच त्यांचा अजेंडा आहे,’ असा दावा त्रिवेदी यांनी केला.
हे ही वाचा:
आदित्य ठाकरे आता स्टॅलिनलाही मिठी मारा…
मणिपूरमध्ये संघर्ष भडकावल्याबद्दल ‘एडिटर्स गिल्ड’च्या चौघांविरोधात गुन्हा
जिल बायडेन करोना पॉझिटिव्ह; जी- २० साठी जो बायडेन यांच्यासह येणार होत्या भारत दौऱ्यावर
पुस्तक योग्यवेळी प्रकाशित झाले नाहीतर लोकाधिकारचं काम एकाधिकारवाल्यांनी लाटलं असतं
उदयनिधी यांचे वक्तव्य काही अचानक आलेले नाही. हे वक्तव्य पूर्णपणे सुनियोजित पद्धतीने आल आहे. मुंबईमध्ये ‘इंडिया’ आघाडीची बैठक झाल्यानंतर उदयनिधी यांनी हे वक्तव्य केले आहे. हे वक्तव्य सुनियोजित पद्धतीने करण्यात आले आहे. याचे पडसाद काय उमटतील, याची खात्रीही त्यांना होती. तरीही हे वक्तव्य करण्यात आले आहे. उदयनिधी यांनी ज्या कागदांवरून ते भाषण वाचून दाखवले, ते भाषण त्यांना कोणी लिहून दिले होते? यामागे ‘इंडिया’ आघाडीची भूमिका काय आहे?, अशी विचारणाही त्यांनी केली आहे.