नर्मदा परिक्रमा एक अद्भूत अनुभव

मराठा मंडळ मुलुंडच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन

नर्मदा परिक्रमा एक अद्भूत अनुभव

मुलुंडच्या मराठा मंडळाच्या वतीने १२ ऑक्टोबर रोजी नर्मदा परिक्रमा एक अद्भूत, विलक्षण आणि चित्ताकर्षक अनुभूती या मुलाखतीच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवार १२ ऑक्टोबर रोजी रश्मी विचारे यांनी सलग साडेचार महिने पायी चालून केलेल्या नर्मदा परिक्रमेसंदर्भात त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात येणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता हा मुलाखतीचा कार्यक्रम होईल. ही मुलाखत सोनाली संतोष सावंत या घेणार आहेत. रश्मी विचारे यांनी २०२० मध्ये ही नर्मदा परिक्रमा पूर्ण केली होती. त्यात जवळपास ३७०० किमी अंतर पायी चालून केलेल्या या परिक्रमेत असंख्य अनुभव आले. त्यासंदर्भात न्यूज डंकाने विशेष मुलाखत घेऊन हे अनुभव आपल्या वाचक, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले होते. मुलुंडच्या मराठा मंडळानेही याची दखल घेत या परिक्रमेचा अनुभव लोकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने या प्रकट मुलाखतीचे आयोजन केले आहे.

हे ही वाचा:

भाजपा शहराध्यक्ष भगीरथ बियांणींनी का केली आत्महत्या?

अनिल देशमुखांचा मुक्काम १ नोव्हेंबरपर्यंत तुरुंगातच

बाळासाहेबांच्या शिवसेनेला ‘ढाल तलवार’

डी कंपनीच्या पाच जणांना घेतले ताब्यात

मंडळाचे इतर कार्यक्रम

रविवार १६ ऑक्टोबर रोजी वधू वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजनही मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. दीपावलीत २६ ऑक्टोबरला सकाळी ६.३० वाजता स्वरमयी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गाणी मनातली, गाणी ओठातली हा जुन्या नव्या गीतकारांच्या गाण्यांचा कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला आहे. स्थळ : मंडळाची सांस्कृतिक केंद्र इमारत, मुलुंड (पू.) अधिक माहितीसाठी संपर्क : रमेश शिर्के, अध्यक्ष मराठा मंडळ, मुलुंड 99875 25540

Exit mobile version