25 C
Mumbai
Thursday, November 14, 2024
घरधर्म संस्कृतीएक लाखाहून अधिक गोविंदांना विम्याचे सुरक्षा कवच

एक लाखाहून अधिक गोविंदांना विम्याचे सुरक्षा कवच

गेल्या वर्षी विमा घेतलेल्या गोविंदांची संख्या ८० हजाराच्या आसपास

Google News Follow

Related

राज्यासह देशभरात गोकुळाष्टमीचा मोठा जल्लोष सुरू असून दहीहंडीमध्ये कोणाचे पथक बाजी मारणार यासाठी चुरस सुरू आहे. अशातच गोकुळाष्टमी उत्सवानिमित्त गोविंदांना मोठा दिलासा मिळाला आहे. यंदा १३०० हून अधिक दहीहंडी पथकांमधील एक लाखाहून अधिक गोविंदांचा विमा उतरविण्यात आला आहे. गेल्या वर्षी विमा घेतलेल्या गोविंदांची संख्या ८० हजाराच्या आसपास होती. २६ ऑगस्टपर्यंत एक लाखाहून अधिक गोविंदांचा विमा काढण्यात आला.

दहीहंडी दरम्यान विमा उपलब्ध करून देण्यात राज्य सरकारची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्सचे मुख्य तांत्रिक अधिकारी टी. ए. रामलिंगम यांच्या मते, उत्सव विम्यासाठी गोळा केलेले प्रीमियम तीन पटीने वाढले आहेत. ही रक्कम पाच वर्षांपूर्वी २० लाख इतकी होती. २०२४ वर्षाच्या पहिल्या तिमाहीपर्यंत हाच आकडा ७० लाखांवर गेला आहे. त्यात विम्याची रक्कम अंदाजे २०० टक्क्यांनी वाढली आहे. सहभागी लोकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यावर सरकारने लक्ष केंद्रित केल्याने विमा पॉलिसीचे प्रमाण वाढल्याचे बोलले जात आहे.

या विम्यांतर्गत प्रत्येक गोविंदाला ७५ रुपयांमध्ये १० लाख रुपयांचा विमा संरक्षणाचा लाभ मिळणार आहे. गेल्या वर्षी १२०० हून अधिक गोविंदा मंडळांनी स्वतंत्रपणे विमा काढला होता. यंदा त्यात १०० हून अधिक मंडळांची भर पडली आहे. दरवर्षी गोविंदा थरावर-थर चढवून हंडी फोडण्याचा सराव करीत असतात. दरम्‍यान यावेळी अनेक गोविंदा जायबंदी होत असतात, तर गोकुळाष्टमीच्या दिवशी हा आकडा मोठा असतो. काही ठिकाणी औषधोपचार वेळेवर न मिळाल्याने गोविंदांचा मृत्यू होतो. परिणामी अपघातग्रस्त गोविंदाना आणि त्यांच्या कुटूंबियांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागते. त्यामुळे विम्याचे कवच मिळाल्यास गोविंदांना आर्थिक संरक्षण मिळते.

हे ही वाचा :

दोन लाख श्रीगणेश निघाले परदेशाला

अयोध्येत ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपी सलमानच्या मुसक्या आवळल्या !

गुजरातमध्ये मुसळधार पाऊस, तिघांचा मृत्यू, सुमारे २०,००० लोक स्थलांतरित !

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त देशभरात २५ हजार कोटींच्या उलाढालीचे थर

दहीहंडी उत्सवाला स्पर्धेचे रूप प्राप्त झाल्याने राज्यातील प्रामुख्याने मुंबई-ठाण्यातील हजारो गोविंदा गोकुळअष्टमीच्या दिवशी ज्या ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आलेले असते. त्या ठिकाणी थरावर-थर चढवून हंडी फोडण्याचा प्रयत्न करतात. तर, या उत्सवात महिलांची देखील गोविंदा पथके सहभागी होत असतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा