पतीचे निधन झाल्यानंतर त्या महिलेला विधवा म्हणणे हा तिचा अपमान होतो. म्हणून तिला ‘विधवा म्हणू नका’ असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे म्हणणे आहे. त्याऐवजी वेगळा शब्द त्यांनी सुचवला असून तो शब्द यापुढे वापरावा असे त्यांनी म्हटले आहे.
चाकणकर यांनी विधवा या शब्दाऐवजी पूर्णांगी हा शब्द सुचवला आहे. त्यामागे नेमके काय तर्कशास्त्र आहे कळलेले नसले तरी विवाहित स्त्रीला तिच्या पतीची अर्धांगिनी म्हटले जाते. त्यामुळे पती निधन पावल्यावर आता तिला पूर्णांगी म्हणा असा तर्क काढला असावा, अशी चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मागे विधवा महिलांनीही मंगळसूत्र, दागिने घातले पाहिजे अशी मोहीम सुरू करण्यात आली होती.
हे ही वाचा:
भ्रष्ट लालू आता आम आदमी पक्षाला वाटू लागले आपले
होळीच्या सणाला ‘पुरणपोळीच्या’ किमतीवरून शिमगा
‘आपल्याच पक्षातील आमदारांना संपवायचे आणि दुसरीकडून भाड्याने घ्यायचे, हे उद्धव ठाकरेंचे काम’
ओळखीच्या लोकांना गुड बाय मेसेज करून शिवराज पाटील चाकूरकरांच्या भावाची आत्महत्या
विधवा प्रथा बंदी कार्यक्रमाच्या अंतर्गत गावागावात जाऊन विधवा महिलांनाही हळदी कुंकू समारंभात सहभागी करून घेणे, त्यांनाही सन्मान देणे हा या कार्यक्रमाचा भाग होता. तेव्हा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विधवा महिलांना एकल म्हणा पण विधवा म्हणू नका असे आवाहन केले होते. मुस्लिम विधवा महिलांसाठी कोणता शब्द असेल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.