शिवसेनेचे दिवाळी मुबारक?

शिवसेनेचे दिवाळी मुबारक?

दादरच्या शिवाजी पार्कचा परिसर सध्या दिवाळीच्या रोषणाईने सजला आहे. शिवसेनेने मुख्यमंत्री निधीतून हा सगळा परिसर दिव्यांच्या लडी, आकाशकंदिल लावून सजविला आहे मात्र एका व्हीडिओने या सगळ्या रोषणाईचा नेमका अर्थ काय असा सवाल सर्वसामान्यांच्या मनात आला.

एका महिलेने हा व्हीडिओ काढत या रोषणाईत ईद ए मिलाद हे शब्द सरकत्या दिव्यांच्या रांगेतून चमकत असल्याचे दाखविले आहे. ती महिला आश्चर्य व्यक्त करते की, दिवाळीच्या दिवसांत ईदच्या शुभेच्छा या दिव्यांतून कशा काय दिल्या जाऊ शकतात? शिवाजी पार्कसारख्या ठिकाणी असे कसे काय घडू शकते?

हा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. शिवाजी पार्क हा शिवसेनेच्या सभांसाठी, शिवसेनेच्या जडणघडणीसाठी ओळखला जाणारा भाग आहे. याच शिवतीर्थावर हिंदुत्वाचा जयघोष शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेला आहे. याच शिवाजी पार्कमधील ही सगळी रोषणाई मुख्यमंत्री निधीतून करण्यात आली आहे. त्यासाठी १ कोटी २५ लाख इतका खर्च करण्यात आला आहे. असे असताना त्यात दिवाळीऐवजी ईदचा शुभेच्छा संदेश कसा काय दिला जाऊ शकतो, असा सवाल शिवाजी पार्कवर वावरणाऱ्या नागरिकांना पडला आहे.

 

हे ही वाचा:

अजित पवार आणि परिवाराचे कोट्यवधींचे घोटाळे उघड

अनिल देशमुख यांना मध्यरात्री १.०६ वाजता अटक

नवाब मलिक तुम्ही मर्द असाल तर माझ्याऐवजी देवेंद्रजींना लक्ष्य करा!

‘एसटी कर्मचाऱ्यांच्या बायकापोरांना दिवाळी नाही का?’

 

यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे सदस्य प्रतीक करपे म्हणतात की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुम्ही हिंदुत्वाला सोडचिठ्ठी दिली आहेच पण शिवाजी पार्कला मोगल पार्क होऊ देणार नाही.

नितेश राणे यांनीही या व्हीडिओची दखल घेत शिवसेनेवर टीका केली आहे. आता काय उरले? शिवाजी पार्कवर दिवाळीच्या शुभेच्छांऐवजी ईद ए मिलादची सजावट दिसते आहे. आता महाराष्ट्रात हिंदू खिजगणतीत नाहीत वाटते. आपल्या सणांनाही महाविकास आघाडीच्या मते किंमत नाही का? आपण पाकिस्तानात राहतो आहोत का?

Exit mobile version