४६ वर्षांनंतर उघडण्यात आलेल्या संभलच्या मंदिराचे एएसआयकडून सर्वेक्षण!

एएसआयने संभलमधील पाच तीर्थक्षेत्रे आणि १९ प्राचीन विहिरींची पाहणी केली

४६ वर्षांनंतर उघडण्यात आलेल्या संभलच्या मंदिराचे एएसआयकडून सर्वेक्षण!

उत्तर प्रदेशमधील संभलमध्ये मंदिर आढळून आले असून या मंदिराचे दरवाजे ४६ वर्षांनंतर उघडण्यात आले. दंगलींनंतर या परिसरातून हिंदू समाज स्थलांतरित झाला होता. यानंतर या मंदिराच्या आजूबाजूचे अनधिकृत बांधकाम पाडण्याचे कामही सुरू आहे. संभलच्या जिल्हा प्रशासनाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला (एएसआय) भस्म शंकर मंदिर, शिवलिंग आणि तेथे सापडलेल्या विहिरीच्या कार्बन डेटिंगसाठी पत्र लिहिले होते. यानंतर शुक्रवारी मंदिराचा सर्व्हे करण्यात आला आहे.

संभलमधील मंदिरात भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने मंदिराचे सर्वेक्षण केले. या प्रक्रियेसाठी चार सदस्यीय तज्ज्ञ पथक तैनात करण्यात आले होते. एएसआयने संभलमधील पाच तीर्थक्षेत्रे आणि १९ प्राचीन विहिरींचीही पाहणी केली. एएसआयने स्थानिक प्रशासनाला विनंती केली होती की त्यांची तपासणी प्रक्रिया मीडियापासून दूर राहतील. यासाठी आठ ते १० तास लागल्याची माहिती आहे. एएसआय लवकरच त्यांचा अहवाल सादर करणार आहे.

हे ही वाचा : 

सपा खासदार झियाउर रहमान बर्क यांच्या घरावर बुलडोजर, पायऱ्या तोडल्या!

कल्याणमधील मराठी माणसावर हल्ला प्रकरणी अखिलेश शुक्ला निलंबित

तलवारीचा नंगानाच करत धमकावणाऱ्या फजल आणि समीरला पोलिसांनी ठोकले!

सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत

संभलमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर गैरकृत्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम राबवली जात असताना वीजचोरीची घटना समोर आली होती. १४ डिसेंबर रोजी परिसरात तपासणी करत असताना अचानक १९७८ सालचे मंदिर सापडले. हे मंदिर ४६ वर्षे बंद होते. यानंतर १५ डिसेंबर रोजी मंदिर उघडण्यात आले आणि तेथे पूजा करण्यात आली. यानंतर विहिरीचा शोध लागल्याची माहिती समोर आली आणि ती खोदण्यात आली. मंदिराजवळील विहीर खोदताना चार ते सहा इंचाच्या तीन मूर्ती सापडल्या. यातील दोन मूर्ती पार्वती आणि लक्ष्मी या देवींच्या असल्याचे लक्षात आले.

Exit mobile version