राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेमुळे भारत नवी उंची गाठेल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेमुळे भारत नवी उंची गाठेल

अयोध्येतील राम मंदिरात होणारी प्राणप्रतिष्ठा हा ऐतिहासिक क्षण भारतीय वारसा आणि संस्कृतीचे वर्धन करेल आणि देशाच्या विकासाच्या प्रवासाला नवीन उंचीवर नेईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन पानी पत्र लिहिले होते. त्याचे उत्तर मोदी यांनी दिले आहे. त्यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया साइटवर राष्ट्रपतींचे पत्र त्याग करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘आदरणीय राष्ट्रपतीजी अयोध्येतील राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या पवित्र क्षणी शुभेच्छा दिल्याबद्दल आभार. हा ऐतिहासिक क्षण भविष्यात भारतीय वारसा आणि संस्कृतीत वाढ करेल तसेच, विकासाच्या प्रवासात नवी उंची गाठेल, असा मला विश्वास आहे,’ असे ते या पत्रात म्हणाले आहेत.

हे ही वाचा:

अयोध्येच्या पानविक्रेत्याचा व्यवसाय फळफळला!

किती जण ‘एक राष्ट्र एक निवडणुकी’च्या बाजूने?

खोदकामात मिळालेल्या ८४ खांबांनी दिला राममंदिराच्या अस्तित्वाचा पुरावा

मुंबईच्या अटल सेतूवर पहिला अपघात!

मुर्मू यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात भारतातील उत्साही वातावरणाचा उल्लेख केला होता. ‘देशव्यापी उत्सवाचे वातावरण हे भारताच्या चिरंतन आत्म्याची अप्रतिबंधित अभिव्यक्ती आहे आणि देशाच्या पुनरुत्थानाच्या नवीन चक्राची सुरुवात आहे. मुर्मू यांनी या पत्रात पंतप्रधानांनी हाती घेतलेल्या ११ दिवसांच्या कठोर अनुष्ठानाचा उल्लेख करून हा केवळ एक पवित्र विधीच नाही तर त्याग आणि आत्मसमर्पण ही एक सर्वोच्च आध्यात्मिक क्रिया आहे. आपल्या राष्ट्राच्या पुनरुत्थानाच्या नवीन चक्राची सुरुवात पाहणारे आपण सर्व भाग्यवान आहोत,’ अशा शब्दांत त्यांनी मोदी यांचे कौतुक केले होते.

Exit mobile version