डीएमकेने स्पष्टच सांगितले की, सनातन धर्म नष्ट करणे हाच इंडी आघाडीचा उद्देश

डीएमकेचे मंत्री पोनमुडी यांनी केले वक्तव्य

डीएमकेने स्पष्टच सांगितले की, सनातन धर्म नष्ट करणे हाच इंडी आघाडीचा उद्देश

तामिळनाडूतील डीएमके पक्षाच्या नेत्यांनी गेल्या काही दिवसांत सनातन धर्मावर अश्लाघ्य भाषेत टिप्पणी केलेली आहे. आता तर सनातन धर्म नष्ट कऱण्यासाठीच इंडी आघाडी तयार करण्यात आल्याचे वक्तव्य डीएमकेचे मंत्री पोनमुडी यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या विषयाला वाचा फुटली आहे.

 

 

तामिळनाडूच्या डीएमके पक्षाचे शिक्षण मंत्री पोनमुडी म्हणाले की, इंडी अलायन्स ही आघाडी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या विरोधात आहे पण खरे तर ती सनातन धर्माविरोधात लढण्यासाठीच बनविण्यात आली आहे. सनातन धर्मातील तत्त्वांचा विरोध करण्यासाठीच ही आघाडी बांधण्यात आली आहे. या आघाडीत असलेल्या २६ पक्षातील नेत्यांचे विचार, मते वेगवेगळी असतील पण आम्ही सनातन धर्माविरोधात लढण्यासाठी एकत्र आलो आहेत. त्यासाठी आम्हाला सत्ता मिळविणे आवश्यक आहे.

हे ही वाचा:

भिडे गुरुजींनी डाव उधळला

सत्तेत बसलेले लबाड, बेईमान नाहीत; संभाजी भिडेंनी जरांगे पाटलांना दिला विश्वास

वंचित समाजाचे डॉ.संजय भोसले यांचा भाजपात प्रवेश !

उत्तर प्रदेशातील २४० मदरशांची मान्यता होणार रद्द

 

याआधी, डीएमकेचे नेते एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यु, मलेरियाशी केली होती. तर त्यांचे आणखी एक नेते ए. राजा यांनी सनातन धर्माची तुलना एड्सशी केली. त्यावरून प्रचंड गदारोळ माजला.

 

 

पोनमुडी यांच्या या वक्तव्यानंतर भाजपाने त्यावर टीका केली आहे. तामिळनाडूतील प्रदेश भाजपाने म्हटले आहे की, डीएमकेला धर्माच्या आधारावर लोकांमध्ये विभागणी करायची आहे. त्यातून त्यांना निवडणुकीसाठी फायदा मिळवायचा आहे. तामिळनाडू भाजपाचे उपाध्यक्ष नारायणन तिरुपती यांनी म्हटले आहे की, पोनमुडी यांच्या वक्तव्यावरून इंडी अलायन्सचा खरा चेहरा समोर आला आहे. तिरुपती यांनी पोनमुडी यांचा व्हीडिओ शेअर करत. त्यांच्या या वक्तव्यातून धर्मामध्ये विभागणी केली जात असल्याचा आरोप केला. सनातन धर्माला विरोध म्हणजे हिंदू धर्माच्या सर्व विधींना विरोध. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने हिंदूंवर आक्रमण करणे हाच त्यांचा हेतू आहे.

Exit mobile version