29 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरधर्म संस्कृतीनमाजाला सुट्टी मिळते, तर बजरंगाच्या पूजेसाठी मंगळवारी सुट्टी द्या!

नमाजाला सुट्टी मिळते, तर बजरंगाच्या पूजेसाठी मंगळवारी सुट्टी द्या!

Google News Follow

Related

बिहार आणि झारखंडमधील अनेक शाळांमध्ये रविवार ऐवजी शुक्रवारच्या सुट्टीचा वाद आता उत्तर प्रदेशात पोहोचला आहे. राज्यातील शाळांना मंगळवारी सुट्टी देण्यात यावी, अशी मागणी यूपीमध्ये अखिल भारतीय हिंदू महासभेने सरकारकडे केली आहे.

जर एखाद्या हिंदूला मंगळवारी बजरंगबलीची पूजा करायची असेल तर त्याला त्या दिवशी सुट्टी देण्यात यावी, असे संघटनेचे म्हणणे आहे. यासोबतच हिंदू महासभेने ‘हिंदू कॅलेंडर’ वापरण्याची आणि राज्यात गुरुकुल सुरू करण्याची मागणीही केली आहे. हिंदू महासभेचे म्हणणे आहे की, बिहारमधील अल्पसंख्याक लोकसंख्या असलेल्या भागातील शाळांना शुक्रवारी सुट्टी आहे, त्यामुळे यूपीमधील शाळांना मंगळवारी सुट्टी देण्यात यावी.

अखिल भारतीय हिंदू महासभेचे प्रवक्ते शिशिर चतुर्वेदी मागण्यांचे निवेदन घेऊन राज्यपालांच्या निवासस्थानी जाऊन लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी करत होते. निवेदनाद्वारे संस्कृत शिक्षकांची भरती, गुरुकुल सुरू करण्याची आणि मंगळवारी सुट्टीव्यतिरिक्त न्यायालयाचे सर्व आदेश हिंदीत देण्याची मागणी ते करत होते. पोलिसांच्या समजुतीवर त्यांनी होकार दिला आणि एसीपी महानगर मार्फत पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना उद्देशून निवेदन पाठवून तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. शहरातील प्रमुख मार्गांपैकी एक असलेल्या विद्यापीठ मार्गावर अचानक झालेल्या या निदर्शनामुळे सुमारे अर्धा तास नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. हिंदू महासभेचे अजय विसेन, गौरव शुक्ला, विक्रम, अलका लाल आणि मोहित यांच्यासह बारा कार्यकर्ते निदर्शनात सहभागी झाले होते.

हे ही वाचा:

तालिबानच्या छळामुळे शीखांनी सोडले अफगाणिस्तान; दिल्लीत येणार

करवा चौथवरील टिप्पणी अपमानास्पद; रत्ना पाठक- शाह, पिंकविलाला नोटीस

विचार बदलला म्हणून काय ठार माराल? उदय सामंत यांचे प्रत्युत्तर

अविनाश भोसलेंचा ड्युप्लेक्स फ्लॅट तर छाब्रियांची जमीन जप्त

शुक्रवारच्या नमाजासाठी शाळांना सुट्टी देण्याचा मुद्दा सर्वप्रथम झारखंडमध्ये समोर आला. त्यानंतर बिहारमध्ये हे प्रकरण पुन्हा गाजले. झारखंड सरकारने शुक्रवारी बंद राहणार्‍या शाळांमधील सुट्टी रविवारची केली असली तरी बिहारमध्ये ही समस्या कायम आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा