राजस्थानमध्ये शिक्षिकेने विद्यार्थ्यांना वाटली हिंदूधर्मविरोधी पुस्तके

राजस्थानमध्ये शिक्षिकेने विद्यार्थ्यांना वाटली हिंदूधर्मविरोधी पुस्तके

राजस्थानमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे. राजस्थानमधील भीलवाडा येथील रूपपुरा येथे सरकारी वरिष्ठ माध्यमिक शाळेतील एका महिला शिक्षिकेने आपल्या विद्यार्थ्यांना ‘हिंदू धर्म: धर्म या कलंक’ नावाची पुस्तिका वाटली होती. विद्यार्थ्यांच्या पालकांनी या कृत्याचा निषेध केला आहे.

इतर शिक्षकांनी याची दखल घेत भिलवाडा येथील मुख्य जिल्हा शिक्षणाधिकारी ब्रह्मराम चौधरी यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. निर्मला कामद या राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यातील असिंद उपविभागातील रूपपुरा येथील सरकारी वरिष्ठ माध्यमिक शाळेत शिक्षिका आहेत. त्यांच्यावर शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये एक पुस्तिका वाटल्याचा आरोप आहे. ही पुस्तिका विशेषतः हिंदू धर्माच्या विरोधात आहे जी ‘हिंदू धर्म: धर्म या कलंक?’ या शीर्षकावरून स्पष्ट होते. म्हणजे ‘हिंदू धर्म: धर्म की आरोप?’. विशेष म्हणजे हा संपूर्ण मजकूर तीन विभागात विभागलेला आहे आणि वितरित पुस्तिकेत या तिन्ही भागांचा समावेश आहे.

फेब्रुवारी २०२२ च्या शेवटच्या आठवड्यात या शिक्षिकेने हे पुस्तक विद्यार्थ्यांना वाटले होते. यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांना याची माहिती मिळताच संतप्त पालकांनी शाळेत येऊन या घटनेची तक्रार केली होती. गावच्या सरपंच सोनिया गुर्जर यांनी २८ फेब्रुवारी रोजी त्यांचे वडील मन रूप गुर्जर आणि इतर ग्रामस्थांसह शाळेला भेट दिली होती आणि शिक्षिकेच्या विरोधात तक्रार केली होती.

हे ही वाचा:

अधिवेशनापूर्वी नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचे आंदोलन

ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात निवडणूक नाहीत

‘मलिक यांचा आणखी एका जमिनीवर कब्जा’

केळव्याच्या समुद्रात सहा जण बुडाले; चार जणांचा मृत्यू

मात्र दुसरीकडे, शिक्षिकेने तिच्या जातीमुळे गावकऱ्यांवर भेदभाव आणि छळ केल्याचा आरोप केला आहे. निर्मला कामद या शिक्षिकेने सांगितले की, पाच महिन्यांपूर्वी मन रूप गुर्जरने शाळेच्या मुख्याध्यापकांच्या नंबरवर फोन करून तिच्याशी बोलले होते. तिने आरोप केला की गुर्जर यांनी सांगितले की गावकरी तिला तिचे केस न सोडण्यास, कारमध्ये येऊन चष्मा घालण्यास आक्षेप घेत होते.

Exit mobile version