मध्य प्रदेशमधील रतलाम येथे एका कुटुंबातील सदस्यांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे. रतलामच्या आम्बा येथील एकाच कुटुंबातील १८ जणांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे. कुटुंब प्रमुख मोहम्मद शाह आता राम सिंह बनले आहेत. रतलाम येथील भीमनाथ मंदिरात महाशिवपुराणच्या पूर्णाहुतीनंतर स्वामी आनंदगिरी महाराज यांच्या उपस्थितीत या सर्वांनी हिंदू धर्म स्वीकारला आहे.
हिंदू धर्माचा स्वीकार करत असताना मुस्लिम कुटुंबाला शेण आणि गोमुत्राने अंघोळ घालण्यात आली. त्यानंतर या सर्वांनी जानवे धारण केले. धर्मांतरापूर्वी सर्व सदस्यांनी शपथपत्र तयार केले होते. त्यामध्ये आपण कुठल्याही दबावाला बळी न पडता धर्मांतर करत असल्याचे स्पष्ट केले होते. या कुटुंबाच्या प्रमुखांनी स्वामी आनंदगिरी यांच्याकडे जाऊन धर्मांतर करण्याची इच्छा बोलून दाखवली होती.
मोहम्मद शाह हे ५५ वर्षांचे असून ते आता गावगोवी फिरुन आयुर्वेदिक आणि तावीज विकतात. त्यांनी कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांसमवेत धर्मांतर केले आहे. स्वामी आनंदगिरी महाराज यांनी धर्मांतराला मान्यता दिल्यानंतर, न्यायालयातून शपथपत्र बनवून घेण्याचे मोहम्मद यांना सूचवले होते. दोन-तीन पिढ्यांपूर्वी त्यांचे पूर्वज हे बोदी समाजाचे असून पुंगी वाजवण्याचे काम करत होते. त्यानंतर रोजगाराच्या शोधात आयुर्वैदीक औषधे आणि ताविज बनवून विकण्यासाठी इतरत्र भटकत राहिले. त्यातूनच त्यांनी मुस्लीम धर्म स्विकारल्याचे मोहम्मद शहा यांनी सांगितले. तसेच आता पुन्हा हिंदू धर्मात आल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर
नुपूर शर्मांवर कारवाईच्या मागणीसाठी मुस्लिमांची हिंसक आंदोलने
पंतप्रधान मोदींच्या देहू दौऱ्यासाठी खास पगडी
मलिकांची याचिका उच्च न्यायालयानेही फेटाळली
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मंदसौरमध्ये शेख जफर शेख, वडिल गुलाम मोइनुद्दीन शेख यांनी हिंदू धर्म स्विकारला होता. धर्मांतरानंतर चेतनसिंह राजपूतच्या नावाने ते ओळखले जातात. शेख जफर यांनी भगवान पशुपतिनाथ मंदिराच्या प्रांगणात धर्मांतर केले.