कर्नाटकात ख्रिश्चन शाळेत मुलांच्या हातावरील राख्या काढून फेकल्या

पालकांनी केले आंदोलन

कर्नाटकात ख्रिश्चन शाळेत मुलांच्या हातावरील राख्या काढून फेकल्या

रक्षाबंधनाचा उत्साह संपूर्ण देशभरात गुरुवारी दिसून आला पण कर्नाटकमधील मंगळूरूच्या मिशनरी शाळेत मात्र रक्षाबंधनावरून काही शिक्षकांना संताप आला आणि त्यांनी मुलांच्या हातातील राख्या काढून फेकून दिल्या. त्यावरून प्रचंड गदारोळ माजला.

इनफंट मेरीज इंग्लिश मीडियम स्कूलमधील मुलांच्या बाबतीत ही घटना घडली. रक्षाबंधनाच्या निमित्ताने काही मुले राखी बांधूनच शाळेत आली होती. पण काही शिक्षकांना ते आवडले नाही. त्यांनी मुलांना राख्या काढायला लावल्या किंवा त्या काढल्या आणि फेकून दिल्या. मुले घरी आल्यावर त्यांनी आपल्या पालकांना ही घटना सांगितली. तेव्हा पालकांनी शाळेत धाव घेतली आणि शिक्षक व शाळेच्या व्यवस्थापनाविरोधात घोषणाबाजी केली.

ही बातमी कळल्यानंतर भाजपाचे व हिंदू संघटनांचे कार्यकर्तेही तिथे जमले. त्यांनी शाळेच्या व्यवस्थापनाला याची माफी मागण्यास सांगितली. या आंदोलनानंतर शाळेनेही मग पालकांची माफी मागितली.

शाळेचे समन्वयक फादर संतोष लोबो म्हणाले की, आम्ही सर्व कर्मचारी व शिक्षकांची बैठक बोलावली आणि त्यानंतर ज्यांनी राखी काढून टाकण्याची चूक केली त्यांनी माफी मागितली.

हे ही वाचा:

‘मुंबई पालिकेला भ्रष्टचारमुक्त करणार’

पुण्यात १३-१४ ऑगस्टला रंगणार मिती शॉर्ट फिल्म फेस्टिवल

कमी उत्पन्न असलेल्या कामगारांनाच यापुढे अटल पेन्शन

काँग्रेस आमदाराला हिट अँड रन प्रकरणी अटक

 

ख्रिस्ती शाळांमध्ये अशा पद्धतीने हिंदू मुलांचा अवमान केला जात असल्याच्या घटना घडत असतात. गुजरातमधील भरूच येथे एका ख्रिश्चन कॉनव्हेंट स्कूलमध्ये मुलींनी हातावर मेहंदी काढली म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. ४० मुलींना शाळेच्या वर्गाबाहेर उभे करण्यात आले होते. त्यावरून आंदोलन झाल्यानंतर शाळेने माफीनामा सादर केला.

 

Exit mobile version