बांगलादेशात नेहमीच तेथील अल्पसंख्य हिंदूंवर अन्याय, अत्याचार होत असतात. १५ मार्चच्या शुक्रवारी राजीवकुमार डे नावाच्या हिंदू व्यक्तीला मारहाण करण्यात आली कारण त्याने मुस्लिमांचा रमझान हा महिना सुरू असतानाही दुकान उघडे ठेवले. बांगलादेशातील सिल्हेट शहरात ही घटना घडली. या हिंदू व्यक्तीला करण्यात आलेल्या मारहाणीमुळे त्याच्या कपाळावर डोळ्याच्या वरच्या बाजुला गंभीर जखम झाली. त्यामुळे डोळा सुजला. तसेच त्या जखमेतून भळभळा रक्तही वाहात होते. या घटनेनंतर भारतात नुकत्याच लागू करण्यात आलेल्या नागरिकत्व कायदा अर्थात सीएएचे महत्त्व अधिक ठळकपणे समोर आले आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.
शेख हसिना यांच्या अवामी लीगच्या विद्यार्थी शाखे (छात्र लीग) चा सदस्य असलेल्या सोहेल हसन याने हा हल्ला केल्याचे समोर आले आहे. सिल्हेट येथील एमएजी उस्मानी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलजवळ डे यांचे दुकान आहे. सोहेल हसनने त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. रमझानच्या निमित्ताने त्याने वर्गणी मागितली. पण डे यांनी ती वर्गणी देण्यास नकार दिला. याच दुकानात डे इफ्तारीही विकत असत. इफ्तारच्या दरम्यान खाल्ला जाणारा आहार म्हणून ते पदार्थ डे विकत असत. पण सोहेल हसनने आपल्या साथीदारासह डे यांच्या दुकानात जाऊन त्यांनी धार्मिक भावना दुखावल्याचे सांगितले. त्यांनी डे यांना असेही सांगितले की, हिंदू व्यक्ती इफ्तारी विकू शकत नाही. त्यानंतर सोहेल हसन आणि त्याच्या साथीदाराने दुकानाची नासधूस केली आणि डे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला.
हे ही वाचा:
शाळेत ‘गुड मॉर्निंग’ ऐवजी ‘जय श्री राम’ बोलल्यामुळे विद्यार्थिनीला शिक्षा
चोरट्याने आधी मंदिरात केली देवपूजा, नंतर केली हातसफाई!
हरवलेल्या दोन भावांचे मृतदेह आढळले मनपा पाण्याच्या टाकीत!
कोलकात्यात पाच मजली इमारत झोपड्यांवर कोसळली!
डे यांना नंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या डोक्याला १८ टाके घालण्यात आले आहेत. सोहेल आणि त्याच्या साथीदारांनी दुकानातील रोख रक्कमही लुटून नेली. डे यांनी सांगितले की, आपल्या दुकानातील रोख रक्कम या हल्लेखोरांनी लुटली. आपल्या दुकानात काम करणाऱ्यांनाही मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर पोलिस तिथे पोहोचले पण अद्याप यासंदर्भात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे.
याआधीही छात्र लीगने अशा प्रकारची कृत्ये केलेली आहेत. बसाबारिया गावातील एका हिंदू कुटुंबाची जमीन इब्राहिम मियाँ या छात्र लीगच्या समन्वयक असलेल्या व्यक्तीने हडप केल्याची घटना जानेवारीत घडली होती.