राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक महत्वाची बैठक आजपासून डेहराडून येथे सुरु झाली आहे. या बैठकीत देशभरातील संघाचे निवडक प्रमुख पदाधिकारी आणि स्वयंसेवक सहभागी होत आहेत. ही बैठक ५ ते ११ एप्रिलदरम्यान उत्तराखंडातील डेहराडूनमध्ये आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे
या बैठकीला सर्व सह सरकार्यवाह आणि संघाच्या शारीरिक, बौद्धिक, व्यवस्था, प्रचार, सेवा आणि संपर्क विभागाच्या प्रमुखांसह एकूण ७५ कार्यकर्त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर डेहरादूनमध्ये संघाच्या अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. तसेच संघाच्या आगामी कार्यक्रमांबद्दलही चर्चा होऊ शकते.
हे ही वाचा:
अतिरिक्त आयुक्तांना जीवे मारण्याची धमकी देणारे सपा नेते अटकेत
संजय राऊतांची मालमत्ता ईडीकडून जप्त
मुख्यमंत्री भेटत नाहीत; शिवसेनेच्या खासदारांची तक्रार
संजय राऊतांच्या कष्टाची कमाई कोट्यवधींची
यावर्षी १०५ ठिकाणी होणाऱ्या संघ शिक्षा वर्गांसह देशभरात अन्य प्रशिक्षण वर्गसुद्धा आयोजित केले जातील. प्रतिवर्षी होणाऱ्या या वर्गांचा अभ्यासक्रम तसेच बौद्धिक व शारीरिक प्रशिक्षणाची पद्धत यावर बैठकीत चर्चा होणार आहे. संघ कार्यकर्ते घडविण्यामध्ये या वर्गांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. अशा अभ्यासक्रमांचे तीन ते पाच वर्षांच्या अंतराने वेळोवेळी पुनरावलोकन केले जाते. याशिवाय मागील वर्षांत झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या चर्चा, योजना आणि निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा करण्याबाबतही बैठकीत विचारविमर्श होईल. यासोबतच विविध प्रांतात सुरू असलेली कार्य आणि विशेष उपक्रम यावरही बैठकीत चर्चा होणार आहे.