माहीममध्ये उभी राहतेय ‘दुसरी हाजीअली’; समुद्रातील अनधिकृत मजारीचा राज ठाकरेंनी केला पर्दाफाश

राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या भाषणात केला घणाघात, दिली एका महिन्याची मुदत

माहीममध्ये उभी राहतेय ‘दुसरी हाजीअली’; समुद्रातील अनधिकृत मजारीचा राज ठाकरेंनी केला पर्दाफाश

माहीममध्येही दुसरी हाजीअली उभारण्याचे कारस्थान सुरू आहे. हे अनधिकृत बांधकाम महिन्याच्या आत तोडण्यात आले नाही तर आम्ही त्याच्या बाजुला गणपतीचे मंदिर बांधू, असा सज्जड इशारा देताना माहीमच्या समुद्रात उभ्या राहत असलेल्या अनधिकृत बांधकामाचा व्हीडिओ मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवाजी महाराज पार्कमधील आपल्या भाषणात दाखविला. गुढीपाडव्यानिमित्त राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष होते. त्यात राज ठाकरे यांनी हा मुद्दा उपस्थित करून सरकारला आव्हान दिले आहे. तसेच मुस्लिम समाजाला हे अनधिकृत बांधकाम मान्य आहे काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

राज ठाकरे यांनी आज या सभेसाठी मोठ्या स्क्रीन लावल्या होत्या. या स्क्रीन कशासाठी आहेत, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यावर मी नंतर काहीतरी दाखवणार आहेत अशी सुरुवात करून राज ठाकरे यांनी माहीममधील या अनधिकृत बांधकामाचा व्हीडिओ दाखवला. माहीमला असलेल्या दर्ग्याच्याच समोरच्या समुद्रात भराव टाकून तिथे एक मजार तयार करण्यात आली आहे. याची माहिती ड्रोनच्या सहाय्याने केलेल्या चित्रीकरणातून स्पष्ट झाली. त्याठिकाणी त्या मजारीवर लोक डोके टेकण्यासाठी समुद्रातून चालत येत असल्याचे आणि तेथे हिरवे झेंडे लावल्याचे त्या ड्रोनमधून दिसत होते.

हे ही वाचा:

कपलिंग तुटले.. शान ए पंजाब एक्स्प्रेसचे दोन तुकडे, डबे मागे ठेऊन गाडी गेली पुढे

भारताने नाक दाबले, ब्रिटनचे तोंड उघडले…

‘शोभायात्रांची सुरुवात डोंबिवलीत झाली आणि मग त्याचे सगळ्यांनी अनुकरण केले’

कौतुकास्पद!! स्टार हॉकीपटू राणी रामपाल हिच्या नावाने आता स्टेडियम

राज ठाकरेंनी हा व्हीडिओ दाखवत म्हटले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालिका प्रशासन, पोलिसदल या सगळ्यांनी याकडे गांभीर्याने पाहायला हवे. आपले दुर्लक्ष झाल्यामुळे हे अनधिकृत बांधकाम उभे राहिले आहे. तिथे कुणाची समाधी आहे, माशाची आहे का? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. आपल्या नाकाखाली अशी बांधकामे उभी राहतात आणि आपण काहीही करत नाही. उद्या आपल्या पायाखालून जमीन निसटून जाईल तेव्हा लक्षात येणार का? असा सवालही राज ठाकरे विचारतात.

राज ठाकरे यांनी इशारा दिला की, जर हे बांधकाम एक महिन्याच्या आत तोडले गेले नाही तर आम्ही त्याच्या शेजारी भव्य गणपती मंदिर उभारू. आम्हाला ते पाऊल उचलावे लागू नये असे वाटत असेल तर महिन्याभरात कारवाई व्हायला हवी. ही काय दुसरी हाजीअली उभी राहते आहे की काय?

राज ठाकरे यांनी सरकारचे अभिनंदन करताना प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझलखानाच्या कबरीभोवतीचे अनधिकृत बांधकाम तोडल्याचे कौतुक केले. पण आता हे माहीमधील अनधिकृत बांधकाम तोडा असे आव्हानही दिले.

मशिदींवरील भोंगे बंद करा नाहीतर आम्ही करू

राज ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांकडे शिवसेना नाव आहे. पण अजूनही मशिदींवरील भोंगे वाजतच आहेत. ते भोंगे बंद करा. भोंग्यांच्या प्रश्नावरून सतरा हजार मनसैनिकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या. मशिदींवरील हे लाऊडस्पिकर तुम्ही बंद करा. नाहीतर दुर्लक्ष करा, आम्ही ते बंद करतो. दोघांपैकी एक निर्णय शिंदे सरकारला घ्यावा लागेल.

Exit mobile version