जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव भारतातील प्रयागराज येथे पार पडत आहे. यासाठी देशासह जगभरातून करोडोंच्या संख्येने भाविक येत आहेत. गंगा, यमुना आणि गूढ सरस्वती नद्यांच्या संगमात स्नान करण्यासाठी लोक जमत आहेत. भाविकांसह साधू आणि बाबाही या महाकुंभ मेळाव्याला उपस्थित राहत आहेत.
कुंभमेळ्यात सनातन धर्माच्या १३ आखाड्यांतील साधूंव्यतिरिक्त अनेक प्रकारचे बाबाही उपस्थित आहेत. यातील काही बाबा हे त्यांच्या नावामुळे, वेषभुषेमुळे तर काही जण त्यांच्या जीवनशैलीमुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यापैकी एक म्हणजे मसानी गोरख बाबा ऊर्फ आयआयटी बाबा. त्यांनी आयआयटी बॉम्बेमधून एअर स्पेस आणि एरोनॉटिकल स्ट्रीममध्ये इंजिनीअरिंग केले आहे. मूळचे हरियाणाचे रहिवासी असलेल्या आयआयटी बाबाचे खरे नाव अभय सिंग आहे.
नवभारत टाईम्सने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. आयआयटी बाबांनी सांगितले की, त्यांनी आयआयटी बॉम्बेमधून चार वर्षे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी भौतिकशास्त्राचे कोचिंगही घेतले. यानंतर ते फोटोग्राफी शिकले. नंतर डिझायनिंग कोर्समध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. इंजिनीअरिंग करून शांती मिळाली नाही म्हणूनच त्यांनी ट्रॅव्हल फोटोग्राफी सुरू केली. आपण देश आणि जग फिरू असे त्यांना वाटले. या कामात खूप मजा येईल आणि पैसाही कमावता येईल. पण या कामातही त्यांना मजा आली नाही. यानंतर ते धार्मिक मार्गावर आले. धर्माच्या जगात आल्यानंतर त्यांना आता जीवनाचा खरा अर्थ कळला आहे, असे आयआयटी बाबा म्हणतात. तुम्ही ज्ञानाचा पाठलाग करत राहिलात तर तुम्ही कुठे पोहोचाल? इथेच तुम्ही पोहोचता, असं आयआयटी बाबा म्हणाले.
हे ही वाचा..
निर्णयांची माहिती लोकांपर्यंतपोहोचविण्यासाठी एआय तंत्राचाही वापर
महाकुंभ मेळाव्यात सहभागी होता येणं हे भाग्यचं!
ऑनर किलिंग रोखण्यासाठी ‘सुरक्षागृह’ निर्णयाची अंमलबजावणी करावी
पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यटन पोलीस नेमणार
सध्या आयआयटी बाबा महाकुंभासाठी म्हणून प्रयागराजमध्ये आले असून त्रिवेणी संगमावर आहेत. याआधी ते चार महिने काशीत राहिले. हरिद्वार आणि ऋषिकेशमध्येही त्यांनी मुक्काम केला.