एका फादरने स्वतःचे अंत्यसंस्कार हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे करण्याची व्यक्त केली होती इच्छा

फादर वर्गीस यांची अंतिम इच्छा पूर्ण

एका फादरने स्वतःचे अंत्यसंस्कार हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे करण्याची व्यक्त केली होती इच्छा

मध्यप्रदेशच्या इंदोरमधील ७१ वर्षीय फादर वर्गीस यांच्या पार्थिवावर त्यांच्या मृत्यूनंतर हिंदू रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रत्यक्षात फादर यांनी सांगितले होते कि जर का मृत्यू नंतर मला दफन केले तर, ती सहा फूट जमीनसुद्धा माझी होईल जे मला कधीच आवडणार नाही. त्यांची अंतिम इच्छाच होती कि, त्यांचे हिंदू रीतीप्रमाणे अंत्यसंस्कार व्हावे. फादर वर्गीस आलेंगदान हे आयुष्यभर सामाजिक आणि धार्मिक सलोख्यासाठी उभे राहिले. आणि त्यांच्या मृत्यूच्या पश्चात सुद्धा ते तसेच वागले. रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यावेळेस त्यांच्या इच्छापत्रानुसार त्यांनी म्हंटले आहे कि, गीता आणि पवित्र बायबल मधील श्लोकांचे पठण करून माझे अंत्यसंस्कार हे हिंदू संस्कृतीप्रमाणे करावेत.

म्हणूनच त्यांच्या अंतिम इच्छेनुसारच त्यांच्या अनुयायांनी त्यांचे अंत्यसंस्कार त्यांच्या अंतिम इच्छेप्रमाणे हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने रामबाग मुक्तिधाम येथेच करण्यात आले. सुप्रसिद्ध फादर वर्गीस यांचे रविवारी निधन झाले त्यानंतर त्यांचे पार्थिव मागील दोन दिवसांपासून रेड चर्च मध्ये दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. गायत्री मंत्र आणि बायबलमधील मंत्र पठणाने त्यांचे इलेक्ट्रिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या संख्येने त्यांचे अनुयायी हजार राहिले होते.

हे ही वाचा:

गुगल, मायक्रोसॉफ्टला टक्कर .. लवकरच येतोय भारतीय बनावटीचा चॅटजीपीटी

भाजपचे लढवय्ये आणि अजातशत्रू खासदार गिरीश बापट यांचे निधन

करमुसे प्रकरणातील आरोपी आणि जितेंद्र आव्हाडांचे माजी अंगरक्षक वैभव कदम यांची आत्महत्या

भाजपा शिवसेना युतीचे नेते म्हणत आहेत ‘मी सावरकर, आम्ही सावरकर’

मृताची विल्हेवाट लावण्यासाठी जाळणे हि उत्तम पद्धत असल्याचे फादर वर्गीस यांना वाटत असल्याचे अंत्यसंस्काराची माहिती देताना कमल गुप्ता यांनी यावेळेस सांगितले. तर फादर वर्गीस यांच्याबद्दल बोलताना फादर साबू म्हणाले कि, फादर वर्गीस यांनी त्यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या मृत्युपत्रामध्ये मी शेवटचा श्वास ज्या ठिकाणी घेईन त्याच मृत्यूच्या ठिकाणी माझे अंत्यसंस्कार व्हावेत.

Exit mobile version