‘मी ख्रिश्चन आहे, मी तिरंग्याला सलाम करणार नाही’

‘मी ख्रिश्चन आहे, मी तिरंग्याला सलाम करणार नाही’

स्वातंत्र्य दिनाचा राष्ट्रध्वज फडकवण्यास आणि सलाम करण्यास नकार दिल्याने सरकारी शाळेच्या मुख्यध्यापिका वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. तमिळसेल्वी असं या मुख्यध्यापिकेचं नाव असून त्या या वर्षी निवृत्त होणार आहेत. त्यानिमित्ताने १५ ऑगस्ट रोजी त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.

तामिळनाडूच्या धर्मापुरी जिल्ह्यातील सरकारी शाळेतील ही घटना आहे. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमादरम्यान शाळेच्या मुख्याध्यापकांनी ती ख्रिश्चन असल्याचे सांगत तिरंग्याला सलामी देण्यास नकार दिला. धार्मिक मान्यतेनुसार ध्वजाला सलामी देण्यास आम्हाला परवानगी नाही, असंही तमिळसेल्वी त्यावेळी म्हणाल्या होत्या.

मुख्याध्यापक तमिलसेल्वी या वर्षी निवृत्त होत होत्या. १५ ऑगस्ट रोजी मुख्याध्यापकाच्या सन्मानार्थ एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या म्हणाल्या की, आमच्या धार्मिक श्रद्धा आम्हाला असे करण्यास परवानगी देत ​​नाहीत. आम्ही फक्त देवाला वंदन करतो इतर कोणाला नाही. आम्ही ध्वजाचा आदर करतो पण आम्ही फक्त देवाला नमस्कार करतो, असं त्या म्हणाल्या होत्या. यापूर्वीही तमिळसेल्वी यांनी राष्ट्रध्वज फडकावण्यास आणि तिरंग्याला सलामी देण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रकरणी धर्मपुरीच्या मुख्य शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. यापूर्वीच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात मुख्याध्यापिकेने रजा घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. इतकंच नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून ती आजारपणाचं कारण सांगून स्वातंत्र्याच्या कार्यक्रमाला शाळेत गैरहजर राहिलेली आहे.

हे ही वाचा:

रश्दी यांच्यानंतर तस्लिमा नसरीन यांनी व्यक्त केली ही भीती

काबूल मशिदीत बॉम्बस्फोट २१ ठार, अनेकजण जखमी

अडीच कोटींच्या हस्तिदंताची चोरी

रोहिंग्यांना फ्लॅट देण्याच्या निर्णयावर नरेंद्र मोदींची फुली

दरम्यान, तमिळसेल्वी यांनी एक व्हिडीओ रेकॉर्ड करून याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ”राष्ट्रध्वजाचा अवमान माझा उद्देश नव्हता. मात्र, मी ख्रिश्चन आहे. आमच्यात केवळ देवाला सलाम करण्याची पद्धत आहे. त्यामुळेच मी इतर कर्मचाऱ्यांना ध्वजारोहण करण्यास सांगितले”, असे त्या म्हणाल्या.

Exit mobile version