संन्यासी योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या आईने का सोपविले राष्ट्रसेवेसाठी?

संन्यासी योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या आईने का सोपविले राष्ट्रसेवेसाठी?

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आई सावित्री देवी यांनी योगीजींच्या आयुष्यातील आठवणींना उजाळा दिला आहे. योगीजींच्या जन्मापासून ते जेव्हा योगीजींनी सन्यास घेण्याचा निर्णय घेतला त्यावेळी या निर्णयाचा सामना सावित्री देवी यांनी कसा केला, काय चाललं होतं त्यांच्या मनात?

१९७२ मध्ये अजय मोहन सिंग बिश्त यांचा जन्म झाला. अजय म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून योगी आदित्यनाथ होय. योगीजींसह त्यांच्या आईला तीन मुली, पुष्पा, कौशल्या व शशी आणि चार मुले मनेंद्र, अजय (योगी), शैलेंद्र आणि महेंद्र अशा सात मुलांची त्या आई आहेत. ती आता दोन मुलांसह उत्तराखंडमध्ये राहते. योगींच्या मार्गदर्शनाखाली उभारलेल्या पाचूर गावाजवळील गोरखनाथ कॉलेजमध्ये मनेंद्र आणि महेंद्र काम करतात. आणि शैलेंद्र हा अमर उजाला या वृत्तपत्रात पत्रकार आहे. पत्रकार शंतनू गुप्ता यांच्याशी संवाद साधताना सावित्री देवी यांनी त्यांच्या कुटुंबाविषयी माहिती दिली.

सावित्री देवी मोजक्या शब्दात व्यक्त होतात. उत्तराखंडच्या पौरी गढवालमधील पंचूर या गावात त्या राहतात. ही माता दररोज पहाटे ४ वाजता उठून स्वतःची कामे स्वतः करते. वय ८५ वर्ष असूनही ती अजून शेतात काम पाहण्यासाठी जाते. तिचे पती आनंदसिंग त्यांचे २०२१ मध्ये निधन झाले आहे. योगींजींच्या वडिलांनी ४० वर्षे वन अधिकारी म्हणून काम केले.
लहानपणी योगी आदित्यनाथ यांनी जेव्हा संन्यासासाठी गोरखपूरला जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या आईला सुरुवातीला वाटले की, त्यांनी एखाद्या सरकारी कार्यालयात नोकरी करण्यासाठी जात आहेत. पण जेव्हा आपल्या मुलाच्या व्रताची बातमी आली तेव्हा तिला अश्रू अनावर झाले होते. लहानपणीच अचानक जेव्हा एक मुलगा तिच्यापासून दूर गेला हे तिच्यासाठी अकल्पनीय होते. आज जेव्हा योगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून उदयास आले आहेत, तेव्हा त्यांच्या आठवणींना उजाळा देताना तिच्या डोळ्यात तेच अश्रू येतात, अभिमानाने ऊर भरून येतो.

तथापि, ‘नाथयोगी’ म्हणून तरुण अजयचा त्यागाचा संकल्प स्वीकारणे आई म्हणून सावित्रीदेवीसाठी सोपे नव्हते. योगी आदित्यनाथ, गोरखपूर मठाचे महंत अवैद्यनाथ यांचे शिष्य होण्यापूर्वी वयाच्या २१ व्या वर्षी त्यांच्या भावांमधील दुसरे अपत्य आहेत. योगींनी गणित विषयात एमएस्सी केली आहे. महंत अवैद्यनाथ यांचा शिष्य होण्यासाठी योगीजी नोव्हेंबर १९९३ मध्ये कुटुंबाला फारशी माहिती न देता गोरखपूरला रवाना झाले. काही महिन्यांनंतरच अजयच्या सन्यासाची बातमी त्यांना वर्तमानपत्रातून कळाली. तेव्हा योगीजींचे वडील पहिल्या गाडीने गोरखपूरला जायला निघाले होते.

आपल्या मुलाला भौतिक इच्छांचा त्याग करताना पाहून ते दोघेही चकित झाले होते. महंत अवैद्यनाथ यांनी योगींच्या पालकांना त्यांच्या मुलाचा सेवेचा संकल्प पटवून दिला. ते त्यांना फोनवर म्हणाले, “तुमच्या चार मुलांपैकी एकाने माझ्यासोबत राष्ट्र उभारणीसाठी आणि हिंदू धर्माच्या बळकटीसाठी यायचे ठरवले आहे; कृपया त्याला देशाची सेवा करण्याची परवानगी द्या” सावित्री देवींना देशाची सेवा करण्याचे आदित्यनाथ यांचे स्वप्न नेहमीच ठाऊक होते आणि म्हणूनच सुरुवातीच्या प्रतिकारानंतर शेवटी तिने परवानगी दिली. सावित्री देवी आणि आनंदसिंग बिश्त यांना त्यांचा मुलगा अजयला संन्यासी वेशात पाहायचे होते. तरुण अजयचा योगी अवैद्यनाथ म्हणून अभिषेक करण्यात आला होता. आणि महंत अवैद्यनाथ यांचा योग्य उत्तराधिकारी म्हणून तो आधीच ओळखला जात होता.

हे ही वाचा:

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचा कार्यकाळ तीन वर्षांसाठी वाढणार

अपहरण झालेला ‘डुग्गू’ अखेर सापडला

अबुधाबी ड्रोनहल्ल्याचा अरब सैन्याने घेतला असा बदला!

मुलायम परिवारातही आता भा’जप’

 

दोन महिन्यांनंतर, योगी आदित्यनाथ त्यांच्या आईकडून भिक्षा घेण्यासाठी संन्यासी म्हणून त्यांच्या घरी गेले. तेव्हा तो त्यांचा मुलगा नव्हता तर एक योगी होता, ज्याने आपल्या सर्व सांसारिक इच्छा आणि संबंध सोडले होते. हे लक्षात येताच त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या व्रताचा आणि त्यांच्या नव्या भूमिकेचा आदर म्हणून त्यांना ‘महाराज जी’ म्हणायला सुरुवात केली.

सावित्री देवी आणि आनंदसिंग बिष्ट यांनी त्यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या मठात दोन वेळा भेट दिली. आज, सावित्री देवी आपल्या मुलाच्या यशाचा आनंद घेत जगाकडे पाहत आहेत. ज्याने योगी म्हणून प्रवास केला, महंत म्हणून काम केले आणि आता भारतातील सर्वात मोठ्या लोकसंख्या असलेल्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत.

Exit mobile version