25 C
Mumbai
Tuesday, July 9, 2024
घरधर्म संस्कृतीजाग हिन्दू बांधवा प्राण संकटी तरी ...

जाग हिन्दू बांधवा प्राण संकटी तरी …

गरळ ओकण्यामध्ये कुठेही कोणीही कमी पडले नाही

Google News Follow

Related

संजय ढवळीकर

नुकत्याच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. त्याचे निकाल आल्यावर चर्चा, टीका, टिपण्णी, मतप्रदर्शन यांना खूप मोठ्या प्रमाणावर उधाण आले. ह्या मध्ये कोणीही मागे राहिले नाही. अगदी संघ स्वयंसेवकांपासून, ते संघटन आणि पक्ष कार्यकर्ते, ते प्रबुद्ध वर्ग, ते सर्वसामान्य नागरिक आणि सर्व समाज आपापल्यापरीने निकाल परिणामांचे विवेचन करून सत्ताधारी पक्षाने कशा प्रकारच्या चुका केल्या, कशा प्रकारचा अहंकार आणि आत्मप्रौढी मिरवली, ते अन्य पक्षांना बरोबर घेऊन कशी चूक केली, ते कुणाला गृहीत न धरण्याचे परिणाम इ.इ. अनेक तर्कवितर्क काढून झाले. विरोधक तर ह्या अशा प्रकारचे मतप्रदर्शन करण्यात अग्रेसर राहिले आणि व्यक्ती केंद्रित टीकाटिपण्णी करून मोकळे झाले. त्यांनी ह्या निकालांचे काय आणि किती विश्लेषण केले, ते त्यांचे त्यांनाच ठाऊक. पण गरळ ओकण्यामध्ये कुठेही कोणीही कमी पडले नाही.

सर्वात कहर म्हणजे पू. सरसंघचालक ह्यांनी संघ शिक्षा वर्गाच्या समारोप प्रसंगी जे बौद्धिक दिले, त्यात मांडलेल्या मुद्द्यांवर आपल्या आकलनाप्रमाणे ज्ञान पाजळून, विरोधकांनी तर कहरच केला. त्यांनी कशा प्रकारे सत्ताधार्यांना कानपिचक्या दिल्या आणि हे आधीच व्हायला हवे होते इ.इ.

खरं पाहता पू. सरसंघचालक आपल्या बौद्धिकांमध्ये जो विचार मांडतात तो मुख्यत्वेकरून हिंदुहित, समाजहित याचा असतो. एखाद्या महत्वाच्या मुद्द्याकडे अथवा बिंदूकडे विशेष लक्ष देणे जरूर असेल आणि तसे होत नसेल, तर ते व्यक्त करणे कि जेणे करून अशा राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यावर प्राथमिकतेने विचार आणि कृती होईल. त्याचबरोबर संघविचारसणीनुसार एखाद्या कृती, निर्णय या मध्ये सर्वसामावेशकता कशी येईल कि ज्यामुळे सर्वस्पर्शी आणि सर्वदूर परिणाम मिळतील, हा त्याचा उद्देश असतो. आणि अशा प्रकारचा विचार ते जरूर वाटेल तेव्हा नेहमी मांडतात. आणि त्यांनी मांडलेले विचार हे समाजहिताचे असल्याकारणाने सर्व स्तरावर त्याचा विचार होतो. सत्ताधारी आणि विरोधक पण आपापल्या पद्धतीने त्याचे विवेचन करून कृती आराखडा ठरवतात. संघामध्ये हि प्रक्रिया सहज आणि स्वाभाविक प्रकारे होते आणि संघ विचार परिवारात हे सर्वमान्य आहे आणि याचा उद्देश हा फक्त आणि फक्त समाज हित आल्याकारणाने त्यावर कुणाला काही आक्षेप नसतो. किंबहुना त्यावर त्वरित विचार होऊन कृती अंमलात आणली जाते. संघामध्ये व्यक्तिनिष्ठ विचार न होता मुद्देआधारित विचार होत असल्याकारणाने ह्यामध्ये काही विशेष असे टीका अथवा कानपिचक्या वगैरे काही प्रकार नसतात. परंतु जे संघाला राजकीय चष्म्यातून बघतात त्यांना हे कळायला आणि उमगायला कठीण आहे. असो.

पू. सरसंघचालकांनी जे काही मुद्दे मांडले, त्यातील चुकीची माहिती पसरवणे हा एक महत्वाचा मुद्दा होता.  ह्याला सध्याच्या भाषेत “नॅरेटिव्ह सेटिंग” असे म्हणतात. मोठ्या प्रमाणात “सामाजिक माध्यम” च्या वापराच्या काळात चुकीची माहिती पसरवण हे फार सोपे आहे. समाज माध्यमांवर आलेल्या अशा चुकीच्या आणि खोट्या बातम्यांवर समाज सहज विश्वास ठेवतो आणि त्याचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणात होतो. ह्या पुढच्या काळात जी युद्धे होतील, ती अशा नॅरेटिव्ह सेटिंग मुळेच होतील.

हे ही वाचा:

क्रांतिकारक सुखदेव यांचे वंशज, पंजाब शिवसेनेचे नेते थापर यांच्यावर प्राणघातक हल्ला

‘कल्की २८९८ एडी’ चारशे पार!

गुजरातच्या बसवरून टीका करणाऱ्या सचिन सावंत यांना वाटू लागले ‘परप्रांतियां’बद्दल प्रेम

तोंडावर आपटलेल्या काँग्रेसचे पुन्हा लष्करावर प्रश्नचिन्ह!

अशा प्रकारच्या नॅरेटिव्ह सेटिंग मध्ये प्रबुद्ध समाज पण सहजपणे फसतो, हे अगम्य आहे. ह्या निवडणुकीच्या काळात अशी चुकीची माहिती अथवा नॅरेटिव्ह सेट केले गेले. आणि सर्व जण न विचार करता त्यात फसले गेले. आता पण रोज हिन्दू समाजाबद्दल मोठ्या प्रमाणावर चुकीचे नॅरेटिव्ह सेट केले जात आहे. त्याला समपर्क उत्तर देता पण येत नाही आणि आले नाही. संपुर्ण बहुमत मिळाल्यास हे सरकार संविधान बदलणार असा खोटा प्रचार केला गेला. खरं तर आपण सांगू शकत होतो कि संविधानामध्ये कधी आणि कसे बदल झाले. ज्यावेळी आजचा विरोधी पक्ष सत्तेत होता आणि बहुमतात होता, तेव्हा काय आणि कसे चुकीचे निर्णय घेतले गेले. सर्वधर्मसमभाव हा शब्द संविधानामध्ये होता का ? तो कधी आणि कशाप्रकारे शिरला? संविधानात बदल कसे, कधी आणि कोणी केले. आंबेडकरांना सर्वाधिक विरोध कधी आणि कुणाकडून झाला, असे अनेक विषय कि ज्यावर नॅरेटिव्हस हे आपण सेट करायला हवे होते. आपण कधी विचार करणार ? ह्या विषयावर चर्चा आपण का करू शकत नाही ? हे विषय आपल्या मनात का येत नाहीत. जाती जाती मध्ये द्वेषाला आपण का चर्चेचा विषय बनवू शकत नाही ? आज अनुसूचित जाती आणि जनजाती आणि सर्व समाज एकमेकात एवढा सरमिसळ झाला आहे कि कुंभामध्ये किती जण ह्या समाजातील असतात, अनेक गणेशोत्सव, दुर्गापूजा, नवरात्रोत्सव इ. उत्सव, आमच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत च्या अनेक विधी मध्ये सर्व समाज मिळून मिसळून राहतो. आमच्या मनात हे भेद कधी नव्हते आणि नाहीत परंतु चुकीच्या नॅरेटिव्हस मधून महिषासुर हा अनुसूचित जातीचा होता, तो हिन्दू नव्हता आणि म्हणून त्याचा वध केला गेला, असा अपप्रचार केला जातो. ह्या अशा प्रकारच्या नॅरेटिव्ह ला पण आम्ही उत्तर देत नाही. आम्ही हे माहित असूनही सांगत नाही कि ब्राम्हण असलेला रावण हा अधर्मी होता म्हणून त्याचा पण वध केला गेला.

असे अनेक प्रकारचे आणि योग्य नॅरेटिव्ह आम्ही सेट करू शकतो परंतु आम्ही कायम अयोग्य प्रकारचे सेट केलेल्या नॅरेटिव्हस ना उत्तर देण्यामध्ये व्यस्त असतो. आमचा सुशिक्षित समाज ह्यावर बोलणे, चर्चा करणे म्हणजे, नसती उठाठेव, रिकामटेकड्यांचे उद्योग, अशिक्षित पणाचे आणि कमी पणाचे समजतो. अल्पसंख्य मुस्लिम समाज हा दलित समाजाबरोबर उभा राहतो. आणि मोठ्या प्रमाणावर, हिन्दू समाजाचा अंग असलेल्या दलित समाजात फूट पाडण्याचा आणि विष कालवण्याचा प्रयत्न करतो, परंतु तेव्हा पण आम्हांला काही प्रत्युत्तर द्यावेसे वाटत नाही.

श्रीरामजन्मभूमीवर प्रभू श्रीरामांचे मंदिर उभे राहिले, हा हिन्दू समाजासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण होता. परंतु असे लक्षात आले कि मुस्लिम समाज ह्या मुळे एकत्र आला आणि त्याने एकगठ्ठा मते हिन्दूविरोधी पक्षाच्या पारड्यात टाकली.
संघपरिवारातील अनेक संस्था ह्या 100% मतदानाचा आग्रह धरत होत्या. नोटाचा वापर करू नये असे सांगत होत्या. हिन्दू हिताचा विचार करणाऱ्या पक्षास मतदान करावे असे सांगत होत्या. नवमतदारांनी नोंदणी करून मतदानाचा हक्क बजावावा यासाठी आग्रह धरत होता.

परंतु अनेक प्रबुद्ध, सुशिक्षित मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली. मध्ये एका कार्यक्रमामध्ये पूज्य स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांच्याबरोबर भेट झाली. त्यांनी सुशिक्षित आणि प्रबुद्ध समाज मतदानापासून दूर राहतो ह्याबद्दल व्यथा आणि खेद व्यक्त केला. म्हणजे सरकार, पक्ष नेतृत्व ह्यांनी काय चुका केल्या आणि काय करायला हवे होते आणि नव्हते याचे अगाध ज्ञान देणारे, आपल्या कर्तव्याचे पालन करण्यात दुर्लक्ष कसे करू शकतात ? आणि ह्या दुर्लक्ष करण्यात सर्वात जास्त आघाडीवर कोण तर सुशिक्षित, सुजाण, प्रबुद्ध मतदार. आणि त्या विरुद्ध मुस्लिम अल्पसंख्य एकगठ्ठा सरकार विरोधी मत देऊन मोकळा… सर्व अल्पसंख्य हे वरून त्यांच्या प्रार्थना स्थळातून जशी आज्ञा येईल त्या प्रमाणे एकगठ्ठा मते टाकून मोकळी होतात. त्या मध्ये वैचारिक अथवा बुद्धिभेद आणत नाहीत.

जसे मतदार निद्रिस्थ तसेच राजकीय पक्ष सत्तेसाठी अल्पसंख्यांचे याचक. त्यांच्यासाठी काहीही आणि कुठल्याही स्थराला जायची तयारी. सर्व महत्वाच्या आस्थापनांमध्ये यांना स्थान. सर्व सरकारी योजनांचे सर्वात जास्त लाभार्थी हेच. आज 26 खासदार निवडून देऊन संसदेमध्ये 5% पेक्षा जास्त प्रतिनिधित्व मुस्लिम समाजाचे झाले आहे. आणि ह्या मध्ये अजून ख्रिचन अल्पसंख्य जोडलेले नाहीत. आज 300 हुन अधिक नगरपालिका आणि परिषदा ह्या मध्ये हिन्दू निवडून येणे हे कठीण झाले आहे. आज 6 राज्य अशी आहेत कि ज्या मध्ये हिन्दू सत्ता येणे हे दुरापास्त आहे.

जे चित्र आज राजकीय क्षेत्रामधील लोकप्रतिनिधी प्रवेशाचे दिसते तसेच आज मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय सेवा आणि सुरक्षा व्यवस्था ह्या मध्ये मुस्लिम समाज शिरकावाचे आहे. आम्ही हिन्दू मतदार अजून किती वेळ अशा निद्रावस्थेत राहणार, हे ईश्वरालाच ठाऊक. अल्पसंख्य समाज आज आमच्या दारावर येऊन उभा राहिला वेगवेगळ्या प्रकारचे जिहाद करू लागला, लव्ह जिहाद, लँड जिहाद, मनी जिहाद, व्होट जिहाद, मांस विक्री, हलाल, इ. अनेक जिहाद सांगता येतील.

आज असे एकही महत्वाचे रेल्वे स्टेशन, एस टी स्टॅन्ड नाही, कि जो ह्यांनी व्यापला नाही, आज आमची सर्व मंदिरे, शैक्षणिक संस्था, आरोग्य संस्था, महत्वाचे मार्ग ह्यांचा आजूबाजूचा परिसर पण ह्यांनी व्यापला आहे. प्लम्बिंग, बिल्डिंग मटेरिअल, फॅब्रिकेशन, इलेकट्रिक, ए सी, वाहन रिपेअर, गॅरेज, सलून, हॉटेल, फळ, भाजी, फुल इ. बाजार, ओला, उबेर सारखी वाहन व्यवस्था, झोमॅटो, स्वीगी अथवा ऍमेझॉन सारख्या लॉजेस्टिक व्यवस्था, आमच्या माता-भगिनी ह्यांचे दैनंदिन संपर्काचे, येण्या जाण्याचे स्थान आणि साधने (उदा. मंदिर, शाळा, बाजार, इ.) स्कुल बस कि ज्या मधुन अल्पवयीन मुली शाळेत जातात येतात, आदी अनेक व्यवसायात घुसून हिंदूंना ह्या मधुन कधीच हद्दपार केले आहे. आंब्याच्या सिझन मध्ये सर्व गावे, शहरे, महामार्ग येथे मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या दुतर्फा मुस्लिमांचे स्टॉल्सच्या स्टॉल्स लागतात. कुठून येतो एवढा भाड्यानी स्टॉल्स घेण्यासाठी, आंबे फळ खरेदीसाठी पैसा ? कोण एवढी मोठ्या प्रमाणावर आंबे फळांची विक्री आणि भाड्याने एवढे स्टॉल्स मुस्लिमांना देतो ?

आज आमच्या न्यायव्यवस्थेला, शैक्षणिक संथांमध्ये आणि धार्मिक स्थळी काय पेहराव घालावा आणि घालू नये यावर वेळ खर्ची घालावा लागतोय. आज महाराष्ट्रातील बहुतेक किल्ल्यांवर ह्यांचे मजार उभे राहिले आहेत. चित्रपट माध्यमातून हिंदूंच्या देवदेवतांवर लांछन लावली जातात. आमची सर्व महत्वाची आणि मोठी धर्मस्थळे , तीर्थस्थळे आणि पर्यटनस्थळे यावर मुस्लिम समाजाचा विळखा पडत चालला आहे आणि हिरवी होत चालली आहेत. हि थोडी अतिशयोक्ती वाटेल पण वास्तविकता हीच आहे.

आज पण जर आम्ही हिन्दू जागे झालो नाही तर पुढे कठीण परिस्थितीला सामोरे जायला लागेल. आणि कठीण काळात आम्ही आमचे कर्तव्य योग्य प्रकारे बजावले नाही म्हणून पस्तावा करायला लागेल. पण वेळ निघून गेलेली असेल आणि इच्छा असेल तरी कोणी मदत करू शकणार नाही आणि काही उपयोग होणार नाही.

म्हणून … जाग हिन्दू बांधवा प्राण संकटी तरी …

(लेखक हे विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय संपर्कप्रमुख आहेत)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
163,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा