उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे महाकुंभ मेळावा होणार असून यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक प्रयागराजमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेश सरकार आणि प्रशासनाकडून यासाठी युद्ध पातळीवर तयारी सुरू आहे. साधूंचेही आगमन होऊ लागले असून यातील अनेक साधू हे त्यांची वेशभूषा, हावभाव यामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. अशीच एक चर्चा आहे ती साडे तीन वर्षांच्या मुलाची जो या साधूंच्या सानिध्यात राहत असून त्यांच्या सारखेच आचरण करत आहे.
महाकुंभमध्ये चर्चेत असलेल्या साडेतीन वर्षांच्या संत बालकाचे नाव श्रवण पुरी असे आहे. जुना आखाड्यातील द्रष्टे आणि नागांमध्ये हे एक असे संत आहेत जे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. या बालकामधील लक्षणे ही साधु सारखीच आहेत, अशी माहिती आहे. श्रवण हा जुना आखाड्याच्या अनुष्ठानात सहभागी होतो, आरती करतो. त्याचे वागणे इतर लहान मुलांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. तो फळे खाण्यास पसंती देतो. तो इतर गुरु बंधुंसोबत खेळतो. त्याच्या बोलामध्ये तो श्लोक, मंत्र म्हणतो. त्यामुळे सध्या या बालकाची चांगलीच चर्चा आहे.
हे ही वाचा :
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचे वारसदार व्हावे”
हिंदू आध्यात्मिक मेळाव्याच्या तिसऱ्या दिवशी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल राहणार उपस्थित
मुस्लिमांना महाकुंभात येऊन दुकान मांडता येईल का?
वणवा घरापर्यंत पोहोचला, पण आपले घर त्यांनी सोडले नाही!
हरियाणाच्या फतेहाबादमधील धारसूलच्या एका दाम्पत्याने फेब्रुवारी २०२१ मध्ये बाबा शाम पुरी यांच्या आश्रमात या बाळाला नवस पूर्ण झाला म्हणून दान केले होते. तेव्हा या बालकाचे वय केवळ तीन महिन्यांचे होते. या बालकाचे नामकरण इतर साधूंनी त्याचे नामकरण केले. तसेच या आश्रमातील संतांनी त्याची काळजी घेतली. लहानपणापासून साधू आणि संत यांच्यासोबत वावरल्याने श्रवण हा त्यांचेच अनुकरण करत आहे. यामुळे तो आध्यात्मिक झाला आहे. एवढ्या छोट्या वयाच्या संताला पाहून लोकही हैराण होत आहेत. जुना आखाड्याचे महंत कुंदन पुरी सांगतात की, मुलांमध्ये देव असतात. हीच मुले साधुच्या रुपात आली तर ती जगासाठी कल्याणकारी ठरतात.