उत्तर प्रदेशातील धर्मांतरांचे समोर आले वास्तव
उत्तर प्रदेश पोलिसांनी धर्मांतर करणाऱ्या एका रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर त्यांची काम करण्याची पद्धत किती धक्कादायक होती, याचे वास्तव आता समोर आले आहे. उत्तर प्रदेश दहशतवादी विरोधी पथकाने नुकतीच मुफ्ती काझी जहांगीर कासमी आणि मोहम्मद उमर गौतम यांना अटक केली होती. त्यांना पाकिस्तानच्या आयएसआयकडून आर्थिक मदत उपलब्ध होत असल्याचाही संशय पोलिसांना होता.
कानपूर येथील मूकबधीर आदित्य गुप्ता याला असेच आमीष दाखवून, फसवणूक करून कादिर बनविण्यात आल्याचा आरोप त्याच्या आईने केला आहे. आदित्यच्या आईने हा प्रसंग सांगितल्याचे व्हीडिओत दिसते. या मुलाचे उमर गौतमनेच धर्मांतर केले. त्याची आई म्हणते की, रमझानच्या महिन्यात काही लोकांना भेटत होता. त्यांनी त्याला इस्लामबद्दल सांगितले आणि त्याला नमाझ पढणे, रोझा कसा ठेवावा हे शिकविले. १५ दिवसांत उर्दू शिकविले. त्याच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे आल्यावर आम्हाला संशय आला की, हे पैसे कुठून आले. नमाझही तो लपूनछपून पढत असे. रोझाही ठेवू लागला होता. एकीकडे १० रुपयाचीही कुणी मदत करत नाही, तर याला हे कोण पैसे देत आहेत. आम्ही पोलिसांत तक्रारही केली. त्यांना सांगितले की, मुलाला जरा समजावा. त्याचा मोबाईल बघून त्याचे सीमकार्ड तोडून टाकले. पण नंतर त्याने असे करणार नाही हे सांगितले. त्या लोकांना आम्ही कधी पाहू शकलो नाही. पण दाढीवाले लोक होते हे आम्हाला कळले.
BIG BRK: Explosive disclosures surface in UP conversion racket
One of the victims,a 24-yr-old deaf-mute boy,from Kanpur who ws allegedly converted into Islam shares details
His mother tells @TusharSrilive how two accused — Umar & Mufti Jahangir used COVID pandemic to tempt him pic.twitter.com/IWcxC7JJ0v
— Rohan Dua (@rohanduaT02) June 24, 2021
उत्तर प्रदेशमधील फतेहपूर येथे कल्पना सिंह यांनीही यासंदर्भात भांडाफोड केला. त्या नुरुल हुडा इंग्लिश मीडियम शाळेत शिक्षिका आहेत. त्यांनी सांगितले की, उमर गौतम या मौलानाने २०२०मध्ये २०-२५ मौलानांसह शाळेत इस्लामचा स्वीकार करण्यासाठी मन वळविण्याचा प्रयत्न केला होता. शाळेतील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना ते आमीष दाखवत असत. त्या बदल्यात आर्थिक मदत करण्याचे आश्वासनही दिले जात असे. गौतम त्यांना सांगत असे की हिंदू धर्मात जे होत नाही ते इस्लाममध्ये होते. त्यानुसार गरजवंतांना आम्ही आर्थिक मदत देतो. कल्पना सिंह यांना त्यांनी असे आश्वासन दिले की, तिने जर इस्लामचा स्वीकार केला तर तिच्या सगळ्या आर्थिक समस्या सोडविण्यासाठी मदत केली जाईल.
कल्पना यांनी असेही सांगितले की, उमर गौतम शाळेतील मुलांना उर्दू, अरबी भाषा शिकविण्यासाठी शाळा व्यवस्थापनावर सक्ती करत असत. शाळेनेही शिशुवर्गातील मुलांना उर्दू आणि अरबी शिकविण्यास प्रारंभ केला. त्या वर्गातील एका शिक्षिकेने या मुलांना नमाझ पढण्यास शिकविण्यास सुरुवात केली. त्यामुळे इतर धर्मीय मुलेही त्याचे अनुकरण करू लागली, तेच घरीही बोलू लागली. त्यामुळे पालकांनी तक्रारी सुरू केल्या. त्यावरून कल्पना सिंह यांनी हा मुद्दा शाळा व्यवस्थापनाकडे नेला. त्यावरून ती हिंदू मुस्लिम असा भेदभाव करत असल्याबद्दल त्यांना नोकरीवरून काढून टाकले. कल्पना यांनी फतेहपूर सदर कोतवालीत तक्रार दाखल केली. पण पोलिसांनी कारवाई केली नाही.