आज रंगांचा होळी हा सण जगभर साजरा होणार आहे. महाराष्ट्रात तर हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा करतात. या सणाला वयाचे जातीचे रंगाचे असे कोणतेच भेदभाव नाहीत. अगदी एखाद्याशी काही कारणाने आपले बोलणे थांबले असेल तर तुम्ही त्याला रंगाचा किंवा गुलालाचा हाताचा तिला लावून होळीच्या शुभेच्छा दिल्यात तर समोरचा अगदी सहजच मागचे सगळे विसरून तुमच्याशी नक्कीच मैत्रीचा हात पुढे करेल. होळी हा मुख्यतः कमीतकमी दोन तर जास्तीत जास्त पंधरा दिवसांचा सण आहे. आदल्या दिवशी होलिका दहन तर दुसऱ्या दिवशी एकमेकांना रंग लावून पाण्याने, फुलांनी आपण होळी खेळतो.
या होलिकादहनाची एक पौराणिक कथा आहे. असुरांचा राजा हिरण्यकश्यपू याने त्याच्या प्रजेला त्याचीच उपासना करायला भाग पाडले आणि देवाची भक्ती करण्यास मनाई केली. हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूचा निस्सीम भक्त होता. त्याला स्वतःची भक्ती करण्यासाठी हिरण्यकश्यपूने आपली बहीण होलिकाची मदत घेतली तिला दुखापत ना होता पेटत्या अग्नीतून बाहेर येण्याचे वरदान होते. जळत्या अग्नीत हिरण्यकश्यपूने तिला आपल्या मुलाला मांडीवर घेण्यास सांगितले तिला वरदान असल्यामुळे ती प्रल्हादाला घेऊन बसते पण , प्रल्हादाला वाचावणाऱ्या भगवान नारायणाच्या कृपेने तिच्या वाईट कृत्यानेच तिचा नाश केला. तो दिवस फाल्गुन पौर्णिमा होता. म्हणून हा दिवस होळी म्हणून आपण साजरा केला जातो. हाच तो दिवस ‘जो वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे” हेच चिरंतन सत्य असल्यामुळे आपण हा दिवस होलिका दहन अर्थात होळी पौर्णिमा आपण साजरा करतो.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाचा फैसला मान्य नाही, पण तो मान्यही आहे!
न्या. शमीम अहमद म्हणाले, देशात गोवंशहत्या बंदी कायदा व्हावा!
भ्रष्ट लालू आता आम आदमी पक्षाला वाटू लागले आपले
महामार्गाच्या कडेला तुम्हाला पाहायला मिळणार ‘बाहुबली’
होळीच्या पहिल्या दिवशी होलिका दहन होते शिवाय काही वर्षांपूर्वी होळी सण जवळ आला कि, घराघरात आपण शेणाच्या चाकोल्या केलेल्या दिसायच्या त्यावेळी दोन होळ्या पेटवल्या जायच्या. एक छोटी होळी आणि एक मोठी होळी. होळी सणाच्या पंधरा ते वीस दिवस आधी घरांतील लहान मुले शेण गोळा करून आणायचे. त्या चाकोल्यांना मध्ये एक मोठे भोक पाडून त्या वाळवून , नारळाच्या दोरीत घालून त्याची माल तैयार केली जायची. या एका माळेत २० ते २५ चाकोल्या असायच्या. जेव्हा आपण होळीच्या पूजेला जातो तेव्हा ह्याच माळा होळीला समर्पित केल्या जायच्या.
होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी जी होळीची धागा असायची त्यावर पाणी गरम करून त्याच पाण्याने अंघोळ करण्याची प्रथा आहे. त्यानंतर साग्रसंगीत होलिकेची पूजा केली जाते त्यानंतरच तिचे दहन केले जाते. सूर्यास्तापूर्वी कधीच होलिका पूजन करत नाहीत. होलिकेच्या अग्नीत भाजलेले पदार्थ खाल्ल्याने पूर्ण वर्षभर ती व्यक्ती निरोगी राहते. होलिका दहनाची राख घरी आणल्यास आपल्या घरातील नकारात्मक शक्तींचा नाश होतो. असे मानले जाते.