जिथे भगवा ध्वज उखडला; तिथेच हिंदूंनी उभारला १०८ फुटी ध्वजस्तंभ

जिथे भगवा ध्वज उखडला; तिथेच हिंदूंनी उभारला १०८ फुटी ध्वजस्तंभ

ऑक्टोबर महिन्यात छत्तीसगडमधील कवर्धा येथील एका चौकात मुस्लिमांकडून भगवा ध्वज हटविण्याच्या संतापजनक  घटनेनंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याविरोधातली तीव्र प्रतिक्रिया तेव्हाही उमटली होती. शनिवारी मात्र तेथील हिंदु समुदायाने प्रचंड संख्येने एकत्र येत तेथे १०८ फूट उंचीचा भगवा ध्वज उभारला आहे. त्या ध्वजस्तंभाच्या उभारणीसाठी, त्या ध्वजाला वंदन करण्यासाठी हजारोंच्या संख्येने हिंदू बांधव तिथे गोळा झाले.

या ध्वजस्तंभाच्या उभारणीसाठी १३ आखाड्यांचे महामंडलेश्वर, महंत, शंकराचार्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत रामजानकी मंदिरापासून ५१०० कलशांसह एक विशाल धार्मिक मिरवणूक काढण्यात आली. दंडी स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या नेतृत्वाखाली जवळपास २० हजारपेक्षा अधिक लोक सहभागी झाले होते. जय श्रीरामच्या घोषणेने परिसर दुमदुमून गेला होता.

यावेळी या विशाल जनसमुदायाला संबोधित करताना अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, भगवा ध्वज हा आमच्या गौरवाचे, अभिमानाचे प्रतिक आहे. कवर्धात जो भगवा ध्वज फडकाविला गेला आहे तो विशाला ध्वज आहे. आपल्या धर्मात आठ प्रकारचे ध्वज आहेत. त्यात भगवा ध्वज सर्वार्थाने सर्वोच्च आहे.

हे ही वाचा:

‘म्हाडा’ भरती परीक्षेत दलालांचा सुळसुळाट? आव्हाड म्हणतात…

…म्हणून पंतप्रधान मोदींचे ट्विटर खाते हॅक झाले?

‘म्हाडा’ ची भरती परीक्षा रद्द झाल्याने परीक्षार्थींचा संताप

बुटांचा आकार आता भारतीय मानकांनुसार

 

अविमुक्तेश्वरानंद म्हणाले की, ज्या भगव्या ध्वजासाठी दुर्गेश देवांगण याला मारहाण झाली होती, त्याच्याच हस्ते या ध्वजाचे आरोहण करण्यात आले आहे. ज्यांनी १५ फुटांवरील ध्वज हटविण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी ही मारहाण केली, त्याला उत्तर म्हणून १०८ फुटांचा ध्वज उभारण्यात आला आहे.

ऑक्टोबर महिन्यात कवर्धा येथील एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यात असा दावा करण्यात आला होता की, मुस्लिमांनी भगवा ध्वज उखडून टाकला होता. त्यावेळी हिंदू मुस्लिमांमध्ये संघर्षही झाला. दगडफेकही झाली. त्यावेळी पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतल्याचाही आरोप झाला.

Exit mobile version