मशिदीची डागडुजी करताना सापडले मंदिर

मशिदीची डागडुजी करताना सापडले मंदिर

परकीय आक्रमकांनी इथली मंदिरे उध्वस्त करून त्या जागी आपल्या धर्माची प्रार्थनास्थळे बांधल्याची अनेक उदाहरणे भारताच्या इतिहासात सापडतात याचीच प्रचिती कर्नाटकामधील मंगळुरू येथे आली आहे. जिथे एका मशिदीची डागडूजी तिथे मंदिराचे बांधकाम आणि अवशेष आढळून आले आहे.

गुरुवार, २१ एप्रिल रोजी हा प्रकार समोर आला कर्नाटकातील मंगळुरू जिल्ह्यात मलाली येथे उभ्या असलेल्या जुम्मा मस्जिदीचा डागडूजीचे काम हाती घेण्यात आले होते. पण हे काम सुरू असतानाच त्या मशिदीच्या खालून जुने बांधकाम आणि अवशेष आढळून आले हे मंदिराचे बांधकाम आणि अवशेष असल्याचे प्रथमदर्शनी जाणवत आहे.

हे ही वाचा:

अमित मिश्राची फिरकी, इरफान पठाण क्लीन बोल्ड

गुरु तेग बहादूर शौर्याचा आदर्श ठेवतात; प्रकाशपर्वाला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संदेश

CISF जवानांच्या बसवर दहशतवाद्यांचा हल्ला; एका जवानाला वीरमरण

‘हिंदुत्वावर मते मागणारे मुख्यमंत्री हनुमान चालिसाला विरोध करतात!’

त्यामुळे आता या मशिदीच्या डागडुजीचे काम थांबवण्यात यावे अशी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे. विश्व हिंदू परिषदेने या प्रकरणात पुढाकार घेतला असून चेन्नई जिल्हा प्रशासनाला डागडुजीच्या कामाला स्थगिती देण्याबाबत आवाहन केले आहे. सर्व कागदपत्रांची योग्यप्रकारे छाननी करूनच पुढील डागडुजीच्या कामाला परवानगी देण्यात यावी असे म्हटले आहे.

तर दक्षिण कन्नडा आयुक्तालयाने या डागडुजीच्या कामाला स्थगिती दिली आहे. जागेची जुनी कागदपत्रे आणि रेकॉर्ड बघूनच पुढील कामाला परवानगी देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Exit mobile version