कर्नाटकातील उडुपी येथील एका महाविद्यालयात मुस्लिम मुली हिजाब घालण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या आहेत. त्यामुळे कॉलेजमध्ये वाद वाढत आहेत. हा मूलभूत अधिकार असल्याचे सांगून मुस्लिम विद्यार्थिनींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुस्लीम विद्यार्थिनींच्या या भूमिकेचा निषेध करण्यासाठी कुंदापूर येथील शासकीय महाविद्यालयातील शंभरहून अधिक हिंदू विद्यार्थ्यांनी भगवा गळापट्टा परिधान केला होता.
हिंदू विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, जेव्हा मुस्लिम मुली हिजाब घालून कॉलेजमध्ये येऊ शकतात, तर आम्ही भगवा गळापट्टा का आणू शकत नाहीत?
उडुपीच्या शेजारी असलेल्या कुंदापूर शहरातील पीयू कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सांगितले की, तब्बल २८ मुस्लिम विद्यार्थिनी हिजाब घालून वर्गात येतात. याच्या निषेधार्थ त्यांनी २ फेब्रुवारीला भगवा गळापट्टा परिधान करून येण्याचे ठरवले. कॉलेजमध्ये हिजाब घालण्यावर बंदी नसताना भगवा गळापट्टा घातला तरी कॉलेज प्रशासनाने हरकत नसावी, असा युक्तिवाद विद्यार्थ्यांनी केला.
#Udupi Another #Hijab row breaks out at Government college in #Kundapura. Management under the new state guidelines has asked girl students not to come college wearing hijab. Girl students refused. Then several #Hindu boys came to college wearing #saffronshawls (1/2) #karnataka pic.twitter.com/p5kLLFeBBj
— Imran Khan (@KeypadGuerilla) February 2, 2022
महाविद्यालयाचे शैक्षणिक वातावरण बिघडू नये म्हणून, याप्रकरणी कॉलेज प्रशासन आणि मुस्लिम विद्यार्थिनींच्या पालकांची बैठक घेतली होती. मात्र, बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. मुली हिजाब घालण्याच्या त्यांच्या हट्टावर ठाम राहिल्या. आता आमदारांनी मुस्लीम विद्यार्थिनींसोबतच भगवा फडकवणाऱ्या हिंदू विद्यार्थ्यांवरही कारवाई करण्याचे सांगितले जात आहे, असे महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष तथा कुंदापूरचे आमदार हळदी श्रीनिवास म्हणाले.
हे ही वाचा:
धक्कादायक! मृत महिलेच्या नावाने लसीकरण प्रमाणपत्र!
मुंबई पालिकेस दिवाळखोरीकडे नेणारा अर्थ (?) संकल्प!
नगरच्या गिर्यारोहकांचा नाशिक मध्ये मृत्यू
आज हिजाब, उद्या नमाज आणि मग…
अशा प्रकारची दहशतवादी मानसिकता असलेल्या विद्यार्थिनींना महाविद्यालयातून हाकलून द्यावे, असे श्री राम सेनेचे प्रमुख प्रमोद मुथालिक यांनी म्हटले आहे. आज ते हिजाबबद्दल बोलत आहे, उद्या बुरखा घालू लागतील, मग ती नमाज आणि मशिदीची मागणी करतील. हे महाविद्यालय आहे की त्यांचे धार्मिक केंद्र? असा प्रश्न श्री राम सेनेने उपस्थित केला आहे.