मॅकडोनाल्ड, केएफसी, बर्गर किंग, पिझ्झा हट यांसारख्या प्रसिद्ध कंपन्या हिंदू, जैन, शीख या बिगर मुस्लिम समुदायाला ‘हलाल’ खाद्यपदार्थ विकत आहेत. देशातील १५ टक्के मुस्लिम समाजासाठी ८० टक्के हिंदू समाजावर हलाल उत्पादने लादणे खपवून घेतले जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका हिंदू संघटनांनी घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून हिंदू संघटनांनी आंदोलन केलं आहे.
या अघोषित हलाल कठोराच्या निषेधार्थ हिंदु जनजागृती समितीसह हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने दादर रेल्वे स्थानकाजवळ, वाशी सेक्टर १७ येथील ‘मॅकडोनाल्ड’समोर आणि ओरियन मॉलजवळ ‘हलाल मुक्त दिवाळी’ आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनात सहभागी हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींनी हातात संदेश असलेले फलक घेतले होते. या ठिकाणी स्वाक्षरी मोहीमही राबविण्यात आली. ती जमा करून शासनाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.
गेल्या काही काळापासून भारतात ‘हलाल’ उत्पादनांना मागणी होत असून हिंदू व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी ‘हलाल प्रमाणपत्र’ घ्यावे लागते. पूर्वी ‘हलाल’ ही संकल्पना केवळ मांसाहारी उत्पादने आणि मुस्लिम देशांमध्ये निर्यात करण्यापुरती मर्यादित होती. पण आता भारतात साखर, तेल, मैदा, चॉकलेट, मिठाई, सौंदर्य प्रसाधने, औषधे इत्यादी विविध उत्पादनांना ‘हलाल प्रमाणित’ मिळू लागले आहे.
हे ही वाचा:
रितेश, जीनिलीयाच्या कंपनीवर मेहेर नजर का?
ठाकरेंचे खोके, एकदम ओके; खोक्यांचा धुरळा आता कोर्टात
सरकारकडून १०० रुपयात ‘आनंदाचा शिधा’
अजित पवार यांनी का घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट?
‘हलाल मुक्त दिवाळी’ साजरी करण्याचे आवाहन
एफएसएसआय आणि एफडीए या भारत सरकारच्या अधिकृत संस्था उत्पादने प्रमाणित करत असताना वेगळ्या ‘हलाल प्रमाणीकरणाची ‘गरज काय? हिंदूंना धर्मस्वातंत्र्य नाही का? ग्राहक म्हणून अधिकार नाहीत का? भारताला धर्मनिरपेक्ष म्हणण्यात आणि धर्माच्या आधारावर उत्पादनांना इस्लामिक प्रमाणपत्र लादण्यात काय अर्थ आहे? असे प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले तसेच हिंदुत्ववादी संघटनांकडून ‘हलाल मुक्त दिवाळी’ साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले.