लव्ह जिहाद, धर्मांतर आणि गोहत्या बंदीच्या मागणीसाठी कोल्हापुरात रविवारी समस्त हिंदू समाजाकडून हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आला. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आक्रमक होत हिंदूंनी एकजूट दाखवून दिली. भगवे कपडे आणि टोपी तसेच परिपरिक पेहरावात शहरातील बिंदू चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्च्यामध्ये अनेक हिंदुत्ववादी संघटना एकवटल्याचे बघायला मिळाले. या मोर्चात सर्वपक्षीय नेते मंडळीही सहभागी झाले. भाजप खासदार धनंजय महाडिकांनी देखील आपला सहभाग नोंदवला आहे.
देशातील विविध भागासह हत्याकांडाच्या घटना घडल्या आहेत. या घटनांचा निषेध करण्यासाठी तसेच देशभरात लव्ह जिहाद प्रकारामुळे हिंदूमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून या विरोधात कायदा करावा अशी मागणी यावेळी हिंदू संघटनांकडून करण्यात आली. हा मोर्चा बिंदू चौकातून सुरू होऊन मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, छत्रपती शिवाजी चौक मार्गे भवानी मंडप कमानी येथे समाप्त झाला. या मोर्चात तरुण तरुणी मोठया संख्येने सहभागी झाल्याचे बघायला मिळाले.
देशात अलीकडच्या काळात काही ठराविक धर्माच्या मुलांना प्रशिक्षण देऊन फंडिंग देऊन हिंदू मुलींना कितवणे व त्यांच्याशी लग्न करून त्यांच्यावर अन्याय करण्यात येत आहे. त्यामुळे या विरोधात आता मोठ्या प्रमाणावर हिंदू एकवटला आहे हिंदू समाज नाराज झाला आहे यासाठी हा प्रचंड मोर्चा काढण्यात आला असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी बोलताना सांगितले.
हेही वाचा :
२०२३ वर्ष आशेचे, आनंदाचे आणि भरपूर यशाचे जावो
चंदा कोचर यांचा ‘पद्म’ पुरस्कार काढून घेणार का?
धर्मांत आणि लव्ह जिहाद कायदा करावा
केंद्र व राज्य सरकारने काही पावलं उचललेली आहेत. या कृत्याला हंडिंग करणाऱ्या पीएफ संघटनांवर बंदी घातली आहे परंतु या संघटना जे काम करत आहेत ते भविष्यात थांबलं पाहिजे त्याचप्रमाणे धर्मांतर कायदा आणि लव्ह जिहाद कायदा सरकारने केला पाहिजे अशी मागणी खासदार महाडिक यांनी यावेळी केली.