येत्या ९ जानेवारीपासून मुंबईतील राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर मैदान, बांगुरनगर, गोरेगाव येथे भव्य हिंदू आध्यात्मिक सेवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून हिंदू मंदिरे, मठ, साधू संत यांच्या रूपाने मानवकल्याणासाठी कशी सेवा केली जाते, याचे प्रत्यक्ष दर्शन घडणार आहे. यासंदर्भात अनेक महानुभावांनी आपली मते व्यक्त केली आहेत.
यासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे म्हणाले की, स्वामी विवेकानंद म्हणाले होते, आत्मनो मोक्षार्थम् जगत् हिताय च हे अध्यात्मही आहे आणि सेवाही करत आहे. सेवा करणे हेच आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे. आध्यात्माच्या आचरणाचा मार्ग सेवेच्या माध्यमातून अधिक प्रशस्त होतो. म्हणून आध्यात्म आणि सेवा हे वेगळे नाहीत तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
हे ही वाचा:
१० लाखांचे बक्षीस असलेल्या दोन महिला नक्षलवादी शरण!
दहशतवादी मोहम्मद शाहिद खानची जामीन याचिका फेटाळली
गुणवत्ता सिद्ध करण्याची हीच नामी संधी !
पाच महिन्यांनी विशाळगडाचे दरवाजे पर्यटकांसाठी उघडले!
हिंदू आध्यात्मिक एवं सेवा संस्थानचे संस्थापक विश्वस्त एस. गुरूमूर्ती यांनी या संकल्पनेमागील भूमिका विषद केली. ते म्हणतात, जगभरातील हिंदूंना एकत्र आणण्यासाठी संघस्वयंसेवकांना प्रशिक्षित केले जात असते. हिंदूंचे ऐक्य हीच आमची संकल्पना आहे. आम्हाला माहीत आहे की, हिंदूंमध्ये प्रचंड विविधता आहे. कारण आपण कुणा एकाच्या अधिपत्याखाली नाही. हिंदूंचा कुणी एक मार्गदर्शक नाही, एक धर्मगुरू नाही. आरएसएसचे हेच कार्य आहे की, ही जी विविधता आहे, त्यांना एका धाग्यात बांधणे. अनेक देवीदेवता, अनेक पूजापद्धती, अनेक प्रार्थना ही हिंदूंची विशेषता आहे त्याला एक ओळख देणे हे संघाचे कार्य आहे.
जगदगुरू शंकराचार्य स्वामी प्रज्ञानंद सरस्वती यांनी सांगितले की, आध्यात्मिक मेळाव्याच्या माध्यमातून सगळ्यांना नवचेतना मिळावी अशी अपेक्षा आहे. एस. गुरूमूर्ती यांनी या संकल्पनेला मूर्त स्वरूपात आणले आहे. ज्यामुळे मानवकल्याणाचे उद्दीष्ट साध्य केले जाईल. राष्ट्रप्रेमींसाठी यातून उत्कर्षाचा मार्ग प्रशस्त होईल. माझ्या या उपक्रमाला भरपूर शुभेच्छा आहेत.
हिंदू आध्यात्मिक एवं सेवा संस्थानचे राष्ट्रीय संयोजक गुणवतंसिंह कोठारी म्हणाले की, २००९ पासून हिंदू आध्यात्मिक सेवा मेळाव्यांचा शुभारंभ एस. गुरूमूर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला. चार वर्षे याचा चेन्नईत याचा यशस्वी प्रयोग झाला. हिंदू सेवा करत नाहीत, हा जो मुद्दा उपस्थित केला जात होता, त्याचे उत्तर त्यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून दिले. हिंदू मंदिर, मठ, साधू संतांच्या रूपात मानवकल्याणासाठी किती प्रकारचे सेवाकार्य केले जाते, हे त्यातून दिसून आले.