काँग्रेस म्हणे महाभारतातही लव्ह जिहाद… हिमंतांनी घेतला खरपूस समाचार

भगवान कृष्ण यांना कोणत्याही वादात ओढणे टाळले पाहिजे.

काँग्रेस म्हणे महाभारतातही लव्ह जिहाद… हिमंतांनी घेतला खरपूस समाचार

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ‘लव्ह जिहाद महाभारतातही घडला होता’ या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेन बोराह यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर जोरदार हल्ला चढवला. काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना भूपेन बोराह म्हणाले होते, “जेव्हा भगवान कृष्णाला रुक्मिणीशी लग्न करायचे होते, तेव्हा अर्जुन एका महिलेच्या वेशात आला होता. महाभारतातही लव्ह जिहाद होता.”

 

बोराह यांच्या वक्तव्याचा निषेध करत हिमंता म्हणाले की, हे वक्तव्य सनातन आणि हिंदू धर्माच्या विरोधात आहे. “भगवान कृष्ण आणि रुक्मिणीचा विषय राजकारणात ओढणे निंदनीय आहे. हे सनातन धर्माच्या विरोधात आहे. मी काँग्रेसला विनंती करतो की, ज्या प्रकारे आपण हजरत मुहम्मद किंवा येशू ख्रिस्त यांना कोणत्याही वादात ओढत नाही, त्याच प्रकारे भगवान कृष्ण यांना कोणत्याही वादात ओढणे टाळले पाहिजे. गुन्हेगारी कृतीशी देवाची तुलना करणे आम्हाला मान्य नाही,” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

काँग्रेस प्रमुखांना उद्देशून हिमंता म्हणाले, “जर कोणी गुन्हा दाखल केला, तर ज्याने असे म्हटले आहे, त्याला अटक करावी लागेल. जर सनातन धर्माच्या हजारो लोकांनी तक्रारी केल्या तर मी वक्तव्य करणाऱ्याला वाचवू शकत नाही.” बोराह यांच्या महाभारताच्या संदर्भाला उत्तर देताना हिमंता म्हणाले की, भगवान कृष्णाने रुक्मिणीला कधीच धर्म बदलण्यास भाग पाडले नाही. हिमंता म्हणाले की जेव्हा एखाद्या मुलीचे खोट्या ओळखीच्या बहाण्याने लग्न केले जाते आणि नंतर तिला तिचा धर्म बदलण्यास भाग पाडले जाते तेव्हा तो लव्ह जिहाद असतो. “जर एखाद्या हिंदूने हिंदूशी किंवा मुस्लिमाने मुस्लिमाशी लग्न केले तर समाज व्यवस्थित होईल. मी नेहमीच हिंदू देवी-देवतांची पूजा केली आहे, पण उद्या नमाज वाचायला सांगितले तर मला कसे वाटेल? हिमंताने विचारले.

हे ही वाचा:

दोन व्यापाऱ्यांची हत्या; मृतदेह जाळून वर्धा नदीत टाकले

सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिहिणाऱ्यांना सोडणार नाही

ट्रेन ९० मिनिटे लवकर आली अन् पाच मिनिटांत सुटली, ४५ प्रवासी राहिले मागे

काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा अंतरिम जामीन मंजूर

 

आसामचे मुख्यमंत्री म्हणाले की, आंतरधर्मीय विवाह असला तरीही, वर अथवा वधू यापैकी कोणालाही धर्म बदलण्याची सक्ती केली जाऊ नये आणि त्यांचे लग्न हे विशेष विवाह कायद्यानुसारच असावे. “जेव्हा आपण या कायद्यांचे पालन करत नाही आणि लक्ष्मणरेखा ओलांडतो तेव्हा लोक लव्ह जिहादकडे वळतात,” हिमंता म्हणाले.

 

काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवताना, भाजपचे फायरब्रँड नेते असलेले हिमांता बिस्वशर्मा म्हणाले, “काँग्रेसवर कधीतरी अशी वेळ येईल की मशीद आणि मदरसे वगळता लपण्यासाठी दुसरी जागा राहणार नाही. तिथेही, AIUDF त्यांचा पाठलाग करेल आणि त्यांना लपायला जागा मिळणार नाही.

Exit mobile version