हिजाब वादाचे पुन्हा पडसाद?

हिजाब वादाचे पुन्हा पडसाद?

गेल्या अनेक दिवसांपासून देशात हिजाब वाद सुरु आहे. या हिजाब वादात नवा ट्विस्ट आला आहे. ऑनलाइन अभ्यासासाठी व्हाट्सअप वर तयार करण्यात आलेल्या ग्रुपमध्ये एका विद्यार्थ्याने पाकिस्तानच्या ध्वजाचे स्टिकर शेअर करून वाद आणखी वाढवला आहे.

व्हाट्सअप ग्रुपमध्ये पाकिस्तानचा झेंडा पाठवून त्यासोबत हिजाब हा आमचा हक्क आहे असा लिहलेला मेसेज विद्यार्थ्याने केला होता. त्यावर आणखी एका विद्यार्थ्याने भारताचा ध्वज शेअर केला. मग पुन्हा एका विद्यार्थ्याने पाकिस्तानचा झेंडा शेअर केला असा हा वाद विद्यार्थ्यांचा व्हाट्सअप ग्रुपवर झाला. ‘हिजाब हा आमचा हक्क’ असे लिहिलेला मेसेज शेअर करणाऱ्या विद्यार्थ्यावर कारवाई करण्याची मागणी हिंदू संघटनेने केली आहे.

विशेष म्हणजे, डिसेंबरपासून कर्नाटकात निर्माण झालेल्या हिजाबच्या वादावर उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. मात्र, न्यायालयाने निकाल दिलेला नाही, न्यायालयाने निकाल राखून ठेवलेला आहे. याआधीही केवळ कर्नाटकातच नाही तर अनेक राज्यांमध्ये हिजाबबाबत धरणे आंदोलन करण्यात आले आहे. ही बातमी एकेकाळी आंतरराष्ट्रीय वाद बनला होता. अनेक जणांनी हिजाब वादाबद्दल आपली मते मांडली होती.

हे ही वाचा:

नवाब मलिकसारखी व्यक्ती मंत्रिमंडळात होती, याचे बाळासाहेबांना काय उत्तर देणार?

राहुल गांधींचे पत्र मिळाले… संजय राऊत यांनी २२ दिवसांनी शेअर केले!

राजीव गांधी यांच्या हत्येतील दोषीला जामीन मंजूर

सरकार दाऊदच्या इशाऱ्यावर चालते आहे का?

हिजाबबाबत निर्माण झालेला वाद आता व्हाट्सअपच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित करत आहे. कर्नाटकातील शिवमोग्गा येथील विद्यार्थ्यांनी मंगळवारी व्हाट्सअप ग्रुपवर पाकिस्तानी ध्वजाचे स्टिकर शेअर केल्याचे सांगितले जात आहे. ज्यावर लिहिले होते की, ‘हिजाब हा आमचा हक्क आहे. यानंतर एका विद्यार्थ्याने याला जोरदार विरोध करत भारतीय ध्वजाचे स्टिकर शेअर केले. ‘हिजाब हा आमच्या हक्काचा’ पाकिस्तानी ध्वज शेअर कार्बन लिहिणाऱ्या विद्यार्थ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तो बीसीएचा विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येत आहे. एका हिंदू संघटनेने याचा निषेध करत विद्यार्थ्याच्या निलंबनाची मागणी केली आहे.

Exit mobile version