हिजाब वादाचे पडसाद विरारमध्ये?

हिजाब वादाचे पडसाद विरारमध्ये?

मुंबईला लागून असलेल्या विरारमधील एका प्राध्यापिकेने शैक्षणिक संस्थेत हिजाबच्या प्रकरणावरून राजीनामा दिला आहे. हिजाब घातल्यामुळे तिला असहकाराचा सामना करावा लागत असल्याचा आरोप प्राध्यापिकेने केला आहे. मात्र, या प्राध्यापिकेचा आरोप व्यवस्थापनेने फेटाळून लावला आहे.

डॉ. बतुल हमीद असं ह्या राजीनामा दिलेल्या प्राध्यापिकेचे नाव आहे. डॉ. बतुल हमीद ह्या गेल्या दोन वर्षांपासून विरारच्या विवा लॉ कॉलेजमध्ये प्राध्यपिका होती.कर्नाटक उच्च न्यायालयाने कर्नाटकात हिजाबबाबत अतिशय स्पष्ट आदेश दिले होते. ज्यामध्ये हिजाबला इस्लामचा अत्यावश्यक भाग नाही असे म्हटले आहे . याच्या निषेधार्थ हिजाबच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास टाळले. दरम्यान, विरारच्या विवा लॉ कॉलेजच्या मुख्याध्यापिकेने हिजाब परिधान केल्याबद्दल कॉलेज कर्मचाऱ्यांच्या असहकार्याचा आरोप करत राजीनामा दिला. यामुळे आता हिजाबवरून युद्ध भडकण्याची शक्यता असून, त्यातच विधी महाविद्यालयात दोन वर्षांपासून हिजाबची कोणतीही अडचण नसताना आता हा मुद्दा का काढला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

प्राध्यापिकेने राजीनाम्याच्या म्हटले आहे की, माझी नियुक्ती १९ जुलै २०१९ रोजी झाली होती, माझ्या कामाचे व्यवस्थापन आणि सहकाऱ्यांनी नेहमीच कौतुक केले आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून मला माझ्या आजूबाजूच्या वातावरणात अस्वस्थता वाटत आहे, कारण माझ्या आजूबाजूचे वातावरण गुदमरणारे आणि अशांत आहे. अशा परिस्थितीत विवा लॉ कॉलेजच्या प्राध्यापिका म्हणून काम करणे माझ्यासाठी खूप कठीण आहे. त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.
प्राध्यापिकेने माध्यमांना माहिती दिली की, “त्यांच्या समाजातील काही विद्यार्थिनी प्रवेशासाठी महाविद्यालयात आल्या तेव्हा असहकार्याचा प्रकार सुरु झाला. संस्थेतील काही व्यवस्थापनांनी आमच्या धार्मिक भावनांचे प्रदर्शन केले आहे. ” अशी तक्रार तिने केली.

हे ही वाचा:

पुढील वर्षीपासून महिला आयपीएल स्पर्धेचा थरार रंगणार

‘राजकारण गेलं चुलीत, फक्त महाराष्ट्र ठीक राहिला पाहिजे’

मध्य रेल्वेला कमाईत मिळाले अव्वल स्थान!

वक्फ बोर्ड आणि सच्चर रिपोर्टची सच्चाई!

मात्र वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी हा आरोप खोटा असल्याचे सांगितले आहे. तसेच विवा लॉ कॉलेजच्या व्यवस्थापनेने या प्राध्यापिकेचे आरोप फेटाळून लावले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत हिजाबबाबत कोणताही वाद झालेला नाही, आता या नव्या पर्वावरून संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version