ज्ञानव्यापी मशिदीतील कार्बन डेटिंगप्रकरणी २१ जुलै रोजी निर्णय

विष्णू जैन यांच्या याचिकेवर विचार केल्यानंतर न्यायालयाने उत्तर दाखल करण्यास सांगितले.

ज्ञानव्यापी मशिदीतील कार्बन डेटिंगप्रकरणी २१ जुलै रोजी निर्णय

वाराणसी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीतील शिवलिंगाचे कार्बन डेटिंग करण्याचा आदेश मशिदीतील सर्वेक्षणाचा भाग म्हणून राखून ठेवला होता. आता २१ जुलै रोजी न्यायालय आपला निकाल सुनावणार आहे. या वर्षी मे महिन्यात, न्यायालयाने काशी विश्वनाथ मंदिराशेजारी असलेल्या संपूर्ण ज्ञानवापी मशिदी परिसराचे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण करण्याची याचिका सुनावणीस घेण्यास सहमती दर्शवली होती. हिंदूंची बाजू मांडणारे वकील विष्णू शंकर जैन यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने मान्य केली होती.

 

विष्णू जैन यांच्या याचिकेवर विचार केल्यानंतर न्यायालयाने ज्ञानवापी मशीद समितीला हिंदू बाजूने केलेल्या निवेदनावर उत्तर दाखल करण्यास सांगितले. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर आता कार्बन डेटिंगचा निर्णय राखून ठेवला आहे. वाराणसीच्या ज्ञानवापी संकुलाच्या आवारातील शिवलिंगाची वैज्ञानिक तपासणी करण्याचा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला दिला होता. हिंदू याचिकाकर्त्यांनी या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी बुर्ज खलिफा तिरंग्याने उजळला

प. बंगाल निवडणुकीतील हिंसाचारांचा प्रारंभ झाला होता माकप, काँग्रेसकडून

रशिया-युक्रेन यांच्यात शांततेसाठी पुढाकार घेण्यास तयार

अश्विनच्या माऱ्यापुढे वेस्ट इंडिज संघ ढेपाळला

एखाद्या व्यक्तीचा जन्म ज्या वर्षी झाला, त्या वर्षाच्या आधारे त्यांचे वय शोधणे सोपे असले तरी, एखादी वस्तू किंवा वनस्पती, मृत प्राणी किंवा जीवाश्म यांच्या अवशेषांसाठी तेच ठरवणे अधिक जटील होत जाते. शतकानुशतके अस्तित्त्वात असलेल्या वस्तूंचा इतिहास किंवा विविध प्रजाती ज्या उत्क्रांती प्रक्रियेतून जात आहेत ते समजून घेण्यात कार्बन डेटिंग महत्त्वाची भूमिका बजावते.

 

सजीव जोपर्यंत जिवंत असतात, तोपर्यंत त्यांच्यात विविध स्वरूपात कार्बन साठवलेला असतो. या कार्बन डेटिंगमध्ये कार्बनमध्ये C-14 नावाचा एक विशेष समस्थानिक म्हणजे आयसोटॉप असतो. याचं अणू वस्तूमान १४ असते. हा कार्बन रेडिओऍक्टिव्ह असतो आणि जसजसे त्या सजीव वस्तूंचा क्षय व्हायला लागतो तसतसा हा कार्बनही कमी होऊ लागतो.

Exit mobile version