दिवाळी अगदीच तोंडावर आलेली असताना राज्यात ठिकठीकाणी रोषणाईला सुरुवात झाली आहे. मॉल्स, दुकाने, ऑफिसेस सर्वत्र सजावट केली जात असताना मुंबईतील एका मॉलमध्ये केलेल्या रोषणाईमुळे वाद निर्माण झाला आहे. मुंबईतील कुर्ला येथील फिनिक्स मॉलमध्ये लावलेल्या रोषणाई हा वादाचा मुद्दा बनला आहे.
मॉलमध्ये ‘जश्न ए दिवाली’ अशा आशयाने सजावट करण्यात आली होती. ‘जश्न ए दिवाली’ लिहिलेला बोर्ड मॉलमध्ये लावण्यात आलेला. या बोर्डला मनसेने विरोध केला आहे. हिंदू सणाला ‘जश्न ए दिवाळी’ अशा उर्दूतून शुभेच्छा देत हिंदू सणाची बदनामी करत असल्याचा आरोप चांदिवली विभागाचे मनसे प्रमुख महेंद्र भानुशाली यांनी केला आहे. मनसेच्या विरोधानंतर फिनिक्स मॉलने सजावटीमधून ‘जश्न ए’ हा शब्द काढून टाकला आहे.
हे ही वाचा:
दापोलीतील वादग्रस्त साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश
बॉडी बॅग खरेदी घोटाळयाप्रकरणी किशोरी पेडणेकरांना ईडीकडून समन्स
छत्तीसगडमध्ये मतदानादरम्यान स्फोट
नेपाळमध्ये ५.६ रिश्टर स्केल भूकंपाच्या धक्क्यात आठ हजार घरांचे नुकसान!
दिवाळीच्या सजावटीनिमित्त ‘जश्न ए दिवाळी’ हा हॅशटॅग मॉलच्या मध्यभागी लावण्यात आला होता. गरज नसताना दिवाळीसारख्या हिंदू सणाला मुस्लिम विचारधारेशी जोडल्याचा आरोप करण्यात आला. त्यावर महेंद्र भानुशाली यांनी जोरदार टीका केली. हिंदू सणाची मुद्दाम बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी जश्न ए दिवाळी वापरण्यात आले आहे. दिवाळीच्या शुभेच्छा, दिवाली की शुभकामनाएं, हॅपी दिवाली हे समजू शकतो पण जश्न ए दिवाळी हा काय प्रकार आहे. आम्ही कोणत्या धर्माचा अपमान करायचा नाही. ज्या पद्धतीने आमच्या सणांसाठी ऊर्दू शब्द वापरला जातो त्याप्रमाणे इतर धर्मांच्या सणांसाठी जय श्रीराम असे हॅश टॅग लिहिले आहे का? असा सवाल त्यांनी केला. त्यानंतर हा शब्द मागे घेण्यात आला.