सुबोध भावे म्हणतात, बापजन्मात ऐतिहासिक बायोपिक करणार नाही

हर हर महादेव वादावरून व्यक्त केली नाराजी

सुबोध भावे म्हणतात, बापजन्मात ऐतिहासिक बायोपिक करणार नाही

ऐतिहासिक चित्रपटांवरून वारंवार होत असलेल्या वादंगाला अभिनेता – निर्माते सुबोध भावे कंटाळले आहेत. सध्या त्यांच्या हार हार महादेव चित्रपटावरून वाद सुरु आहे. या चित्रपटातील काही दृश्यांवरुन आक्षेप घेण्यात आला आहे. या चित्रपटात संभाजीराजे छत्रपती यांनी दाखवलेल्या इतिहासावर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यामुळे या सततच्या वादाला कंटाळून सुबोध भावे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे बापजन्मात ऐतिहासिक बायोपिक करणार नाही, असे सुबोध भावे यांनी स्पष्ट केले आहे. ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या वादावरून त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

हर हर महादेव चित्रपटात सुबोध भावे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवण्यात आला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यादृष्टीने चित्रपटातील काही उल्लेख आणि दृष्य काढून टाकावी अशी मागणी होत आहे. ठाण्यामध्ये हर हर महादेव चित्रपटाच्या प्रदर्शनच्यावेळी गोंधळ घालण्यात आला होता. या चित्रपटावर आक्षेप घेत कोल्हापुरातील काही शिवभक्तांनी अभिनेता सुबोध भावेची भेट घेतली. या भेटीदरम्यान आणि हर हर महादेव या चित्रपटावरून सध्या सुरु असलेला वाद आणि शिवभक्तांच्या भेटीनंतर सुबोध भावे यांनी भविष्यात ऐतिहासिक बायोपिक करणार नाही असा निर्णय घेतला आहे.

हर हर महादेव झी वाहिनीवर दाखवण्यात येणार असल्याची जाहिरात देखील करण्यात येत आहे. त्यावरून देखील नवीन वाद सुरु झाला आहे. रविवारी हा चित्रपट झी वाहिनीवर प्रदर्शित होत आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांवरील माझं प्रेम आयुष्यभर राहील. त्यांच्या चित्रपटातून मला जे काही मिळालं, ते मी मरेपर्यंत करत राहणार. पण यापुढे ऐतिहासिक चित्रपटातील भूमिका बापजन्मात करणार नाही. आता शूटिंग सुरू असलेला शेवटचा बायोपिक असेल”, असं सुबोध भावे यांनी या भेटीत स्पष्ट केली. त्यानंतर सुबोध भावे यांनी हात जोडले.

हे ही वाचा:

उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल

‘अरुणाचलच्या तवांगमध्ये धर्मांतरणाविरोधात लढणारा सैनिक म्हणजे तेची गुबीन’

ठाकरेंचा घँडीवाद

नीरज चोप्राचा आणखी एक विक्रम

या वादाच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारला मी पत्र पाठवणार आहे. त्यांनी इतिहासकारांची एक स्वतंत्र समिती स्थापन करावी. त्याचे प्रोटोकॉल सेट करावेत. पहिलं महाराष्ट्रात स्क्रिनिंग होऊन नंतर केंद्राच्या समितीकडे चित्रपट पाठवावा. कारण आम्हाला केंद्राच्या समितीवर विश्वास नाही. तिथं कोण इतिहासकार बसलेत त्याची आम्हाला कल्पना नाही असे पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले.

Exit mobile version